Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023 च्या पहिल्याच हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी...

Harmanpreet Kaur: महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सुरु आहे.

Manish Jadhav

WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर इतिहास रचला आहे. या सामन्यात तिने 30 चेंडूत 65 धावा केल्या. यादरम्यान तिने आपल्या बॅटने 14 चौकार मारले.

दरम्यान, हरमनप्रीत कौरची ही खेळी पाहून मैदानात बसलेले सगळेच आश्चर्यचकित झाले. हरमनने महिला प्रीमियर लीगमध्ये शानदार पदार्पण केले. तिची ही खेळी वर्षानुवर्षे स्मरणात राहील. हरमनप्रीत कौरने आपल्या खेळीच्या जोरावर या सामन्यात मुंबई संघाला 207 धावांपर्यंत पोहोचवले.

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) आपल्या खेळीने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात अर्धशतक झळकावताच मोठा विक्रम केला. महिला प्रीमियर लीगमध्ये अर्धशतक ठोकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

दुसरीकडे, हरमनप्रीत कौरने या सामन्यात 216.67 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या खेळीदरम्यान तिने चौफेर फटकेबाजी केली.

हरमनप्रीत कौर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेतही ती शानदार फॉर्ममध्ये होती. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

तसेच, हरमनप्रीतचा हा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) चांगला संकेत आहे. याचा फायदा संघाला मोसमात होणाऱ्या सामन्यांमध्ये मिळेल. हरमनप्रीत कौरशिवाय मुंबईकडून हेली मॅथ्यूजने 47 आणि अमेलिया कारने 45 धावा केल्या. या खेळीमुळे मुंबई संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

SCROLL FOR NEXT