Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

ODI World Cup: भारताला मिळाला दुसरा युवराज सिंग, वर्ल्डकपमध्ये 'या' खेळाडूला संधी मिळाली तर...!

2023 ODI World Cup: आता युवराज सिंगने निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये एक खेळाडू त्याच्यासारखीच बॅट स्विंग करताना दिसत आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: युवराज सिंग, हे नाव क्वचितच भारतीय क्रिकेटप्रेमींना माहीत नसेल. भारताचा स्टार क्रिकेटर, ज्याने एकदा नव्हे तर दोनदा विश्वचषकाची चमकदार ट्रॉफी मिळवण्यात मोलाचे योगदान दिले.

2011 च्या विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. आता युवराज सिंगने निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये एक खेळाडू त्याच्यासारखीच बॅट स्विंग करताना दिसत आहे. लोक आता म्हणू लागले आहेत– भारताला दुसरा युवराज मिळाला आहे.

आयपीएलमध्ये या खेळाडूने धुमाकूळ घातला

ज्या फलंदाजाचा उल्लेख केला जात आहे, तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू तिलक वर्मा आहे. तिलक सातत्याने आपल्या फलंदाजीने प्रभावित करत आहे.

18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने 17 चेंडूत 37 धावा केल्या.

तिलकच्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. आतापर्यंत तिलकने 5 सामन्यात 214 धावा केल्या असून त्याची सरासरी 53.50 आहे.

वर्ल्डकपसाठी संधी देण्याची मागणी होत होती

तिलक वर्माच्या कामगिरीने प्रभावित होऊन क्रिकेट चाहते आगामी एकदिवसीय विश्वचषक-2023 मध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी करत आहेत.

हैदराबादचा राहणारा 20 वर्षीय तिलक ऑफ-स्पिन गोलंदाजीही करु शकतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3 डावात 3 बळीही घेतले आहेत.

या आयपीएलमध्ये (IPL) तिलक वर्माने आरसीबीविरुद्ध 84 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यानंतर तिलकने 46 चेंडूंचा सामना करत 9 चौकार, 4 षटकार मारले.

युवराजची झलक

आयपीएल (IPL-2023) च्या चालू हंगामात तिलक वर्माची अशीच नेत्रदीपक कामगिरी पाहून भारतीय चाहते खूप प्रभावित झाले आहेत.

एवढेच नाही तर तिलकच्या फलंदाजीत युवराजची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तिलकने वनडे विश्वचषक 2023 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, तिलकची कारकीर्द अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.

असे करिअर आहे

तिलकने आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणीमध्ये 7 सामने, लिस्ट ए मध्ये 25 आणि टी-20 मध्ये एकूण 41 सामने खेळले आहेत.

त्याने प्रथम श्रेणीमध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 409 धावा केल्या. त्याचवेळी, लिस्ट ए मध्ये, त्याने 5 शतके आणि तब्बल अर्धशतके केली.

या फॉरमॅटमध्ये त्याने 1236 धावा केल्या आणि 8 विकेट घेतल्या. T20 फॉरमॅटमध्ये 37.91 च्या सरासरीने 1289 धावा करण्यासोबतच त्याने 2 विकेट्सही घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

32व्या वर्षीच क्रिकेटला अलविदा! भारतीय फलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, कारकिर्दीत 5,000 पेक्षा जास्त धावा अन् 12 शतकांचा विक्रम!

Construction Rules Change: गोव्यात 300 चौ. मी.च्या भूखंडांनाही वाढीव एफएआर, उंचीची मुभा; बांधकाम नियमांत मोठा बदल

Horoscope: गुरुवार कोणत्या राशींसाठी ठरणार खास? मेष राशीचे आर्थिक बजेट बिघडणार, तूळ-मकरसमोर कामाची आव्हाने; धनु-मीन राशीला मिळणार कमाईची संधी

IFFI Health Films: एड्सपासून पार्किन्सनपर्यंत! 'इफ्फी'मध्ये आरोग्यव्यवस्थेचे वास्तव उलगडणारे 3 चित्रपट

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

SCROLL FOR NEXT