Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याने मोडला लाईव्ह स्ट्रीमिंगचा रेकॉर्ड; इतक्या कोटी प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिला सामना

World Cup 2023: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी सुरु झालेल्या सामन्यात लाइव्ह स्ट्रीमिंगचा नवा विक्रम रचला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023 India vs South Africa Match Live-Streaming Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी सुरु झालेल्या सामन्यात लाइव्ह स्ट्रीमिंगचा नवा विक्रम रचला गेला. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेला हा सामना डिस्ने + हॉटस्टारवर 4.4 कोटी लोकांनी लाइव्ह पाहिला.

सामन्याच्या पहिल्या डावात, जेव्हा भारत फलंदाजी करत होता, तेव्हा 4.4 कोटी दर्शक एकाच वेळी Disney+Hotstar वर लाइव्ह होते. नवीन विक्रम रचल्यानंतर, ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+Hotstar ने चाहत्यांचे आभार मानले.

यापूर्वी, 22 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान, 4.3 कोटी प्रेक्षकांनी Disney + Hotstar वर थेट सामना पाहिला होता. यापूर्वी, अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना डिस्ने + हॉटस्टारवर 3.5 कोटी प्रेक्षकांनी थेट पाहिला होता.

केंद्रीय मंत्री म्हणाले - डिजिटल इंडियाची कमाल

दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी स्ट्रीमिंग रेकॉर्ड आणि विराट कोहलीच्या रेकॉर्डवर आनंद व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या X हँडलवर लिहिले – विराटचे शतक आणि 4.4 कोटी दर्शक. #DigitalIndia ची कमाल.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोलकाता येथे झालेल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील हे त्याचे 49 वे शतक ठरले. या शतकासह कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतके आहेत.

दुसरीकडे, आजचा सामना विराट कोहलीसाठी देखील खास होता. कारण आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व (8) सामने जिंकले आहेत.

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ आहे. सध्या टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे, जो येत्या रविवारी म्हणजेच 12 नोव्हेंबरला खेळवला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT