Kishore Kumar Jena | Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

World Athletics 2023: नीरजचे लक्ष्य 'गोल्ड' मेडलवर! 'हे' भारतीय खेळाडूही शर्यतीत; कधी अन् कुठे पाहाणार फायनल?

World Athletics 2023 Final: वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी फायनल होणार असून नीरज चोप्राही ऍक्शनमध्ये असणार आहे. हे फायनल कधी आणि कुठे पाहू शकता जाणून घ्या.

Pranali Kodre

World Athletics Championships 2023 Final Live Streaming Details:

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी विविध क्रीडा प्रकारातील अंतिम फेरी पार पडणार असून भारताचे काही खेळाडू या फेऱ्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यातील पुरुषांची भालाफेकीची अंतिम फेरी लक्षवेधक असणार आहे. कारण ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासह भारताचे तीन भालाफेकपटू या फेरीत खेळताना दिसणार आहेत.

बुडापेस्ट, हंगेरी येथे होत असलेल्या या स्पर्धेत 25 वर्षीय नीरजने क्वालिफिकेशन फेरीत 88.77 मीटर भालाफेक करत अव्वल क्रमांकासह अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. याबरोबरच त्याने पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.

नीरजने गेल्यावर्षी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. त्यामुळे त्याचे यंदा सुवर्णपदकावर लक्ष असेल.

दरम्यान, रविवारी पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजसह भारताचे डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन खेळाडूही पदकाच्या शर्यतीत आहेत. त्यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदा भारताचे तीन भालाफेकपटू पदकाच्या शर्यतीत असणार आहेत.

रिले संघाचीही शानदार कामगिरी

भारताचा 4x400 मीटर रिले पुरुष संघानेही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या संघात मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकॉब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे.

भारतीय संघ हिट्समध्ये 2 मिनिटे 59.05 सेकंदाचा वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे भारतीय संघही रविवारी अंतिम फेरीत खेळताना दिसेल.

पारुल चौधरीचीही अंतिम फेरीत धडक

पारुल चौधरीने स्टिपलचेसमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने हिटमध्ये 9:24.29 सेकंदाची वेळ नोंदवली आणि पाचव्या क्रमांक मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही ठरली.

किती वाजता होणार अंतिम फेरी?

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी पुरुषांची भालाफेकच्या अंतिम फेरीला रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच पारुल चौधरीची स्टिपलचेसची अंतिम फेरी मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटाने सुरू होणार आहे. याशिवाय पुरुषांच्या रिले शर्यतीची अंतिम फेरी मध्यरात्री 1 वाजून 7 मिनिटांनी सुरु होणार आहे.

कुठे पाहाता येणार अंतिम फेरी?

बुडापेस्टला होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम फेऱ्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहाता येणार आहे. तसेच ऑनलाईन जियो सिनेमा ऍप किंवा वेबसाईटवर थेट प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

Ajit Pawar Passed Away: पर्वरीतील कार्यालयाचे उद्घाटन अधुरेच! फेब्रुवारीतील 'दादांचा' नियोजित गोवा दौरा कायमचा रद्द

Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

SCROLL FOR NEXT