India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20I World Cup 2023: दुसऱ्या वॉर्मअप मॅचमध्ये भारतीय महिलांची बाजी, आता सामना पाकिस्तानशी

महिला टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाने दुसरा वॉर्मअप सामना जिंकला असून आता 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे.

Pranali Kodre

Women's T20I World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारीपासून महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व 10 संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळले आहेत. दरम्यान, भारतीय महिला संघाने बुधवारी बांगलादेश महिला संघाविरुद्ध दुसरा सराव सामना 52 धावांनी जिंकला आहे. पण भारताला पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

बांगलादेशविरुद्ध भारताचा विजय

भारतीय महिला संघाने बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 183 धावा केल्या होत्या. भारताकडून रिचा घोषने 56 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी केली.

तसेच जेमिमाह रोड्रीगेजने 41 धावा केल्या. या दोघीव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. बांगलादेशकडून नाहिदा अक्तरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघाला 20 षटकात 8 बाद 131 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून निगर सुलताना जोतीने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली, तसेच मुर्शिदा खातूनने 32 धावांची खेळी केली. अन्य कोणी खास काही करू शकले नाहीत.

भारताकडून देविका वैद्यने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाड, अंजली सारवानी, दिप्ती शर्मा, राधा यादव आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव

भारतीय महिलांचा पहिला सराव सामना 6 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताला 43 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. कमी धावसंख्येच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला माफक 130 धावांचे आव्हान दिले होते.

पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 15 षटकात 86 धावांवरच संपुष्टात आला होता. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद 19 धावा केल्या होत्या. तिच्याव्यतिरिक्त भारताकडून केवळ हर्लिन देओल (12) आणि अंजली सारवाणी (11) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 129 धावा करता आल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेअरहॅमने सर्वाधिक नाबाद 32 धावा केल्या.

तसेच जेस जोनासरने नाबाद 22, बेथ मुनीने 28 आणि ऍश गार्डनरने 22 धावांची खेळी केल्या. भारताकडून राधा यादव, शिखा पांडे आणि पुजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाडने 1 विकेट घेतली.

भारताचा आता सामना पाकिस्तानशी

मुख्य टी20 वर्ल्डकप स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून भारताचा पहिला सामना 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध केपटाऊनला होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. पाकिस्ताननंतर भारताला साखळी फेरीत वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि आयर्लंड संघाशी सामना खेळायचा आहे.

टी20 महिला वर्ल्डकप 2023 मधील भारतीय संघाचे वेळापत्रक

12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

टी20 महिला वर्ल्डकप 2023साठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका शरवन, अंजली सारवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव खेळाडू: एस मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT