India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: स्मृती मानधनाच्या जागेवर कोणाला मिळणार संधी? अशी असेल टीम इंडियाची Playing XI

महिला टी२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी (12 फेब्रुवारी) भारतीय महिला संघाचा पहिला सामना पाकिस्तान महिला क्रिकेट संघाशी होणार आहे. या सामन्यातून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आठव्या महिला टी20 वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करतील.

दरम्यान, या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाला बोटाच्या दुखापत झाली असून त्यातून ती अद्याप सावरलेली नाही. त्यामुळे ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल.

आता अशा परिस्थितीत मानधनाच्या जागेवर सलामीला कोण फलंदाजी करणार हा प्रश्न भारतीय संघासमोर असेल. तरी मानधनाच्या जागेवर सलामीला शफाली वर्माबरोबर जेमिमाह रोड्रिग्जलाच संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे मधल्या फळीची जबाबदारी यास्तिका भाटीया, कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासह यष्टीरक्षक ऋचा घोषवर असेल. तसेच त्यांना अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि देविका वैद्य यांचीही साथ मिळू शकते. दीप्तीवर फलंदाजीबरोबरच गोलंदाजीची मोठी भिस्त असणार आहे.

दीप्ती आणि देविका यांच्याव्यतिरिक्त गोलंदाजी फळीत रेणूका सिंग, राधा यादव, शिखा पांडे, पूजा वस्त्राकार यांना संधी दिली जाऊ शकते. रणूका गेल्यावर्षापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. तसेच भारतीय संघाला राधा, शिखा आणि पूजा यांच्याकडूनही मोठी अपेक्षा असेल.

(Women's T20 World Cup, India vs Pakistan: India's Predicted Playing XI)

दरम्यान, भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला यांच्यात आत्तापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 10 सामने भारतीय महिलांनी जिंकले आहेत, तर 3 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

आता या दोन्ही संघातील 14 वा सामना रविवारी केपटाऊनला होणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे.

भारतीय महिला संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन -

जेमिमाह रोड्रिग्ज, शफाली वर्मा, यास्तिका भाटीया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक) देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव, शिखा पांडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Goa:"सनबर्न नाही तर दुसरं कोणीतरी येईल" पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Assembly: गोमंतकीयांना मिळणार स्वस्त दरात मासळी, सरकार धोरणात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री

Sadetod Nayak: मराठी राजभाषेसाठी माझा पूर्ण पाठिंबा - जीत आरोलकर

Goa Assembly Live: १७ (२) अंतर्गत जमीन रुपांतर नाही!

Goa Assembly Session: पंधरा वर्षे पूर्ण झालेल्‍या 28,110 वाहनांचे नूतनीकरण! वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

SCROLL FOR NEXT