Harmanpreet Kaur Run-Out Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs AUSW: तोच हा क्षण, जेव्हा भारतापासून T20 WC दुरावला! पाहा 52 धावांवर कशी रनआऊट झाली हरमनप्रीत

महिला टी20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये हरमनप्रीत कौरशी विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली.

Pranali Kodre

India Women vs Australia Women: दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी२० वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5 धावांनी विजय मिळवत सातव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. दरम्यान, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 28 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण यानंतर हरमनप्रीत कौरने जेमिमाह रोड्रीग्ज आणि नंतर ऋचा घोषला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला होता.

हरमनप्रीतने जेमिमाहबरोबर चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 69 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले होते. जेमिमाह 43 धावांवर बाद झाल्यानंतरही तिने ऋचाबरोबर चांगली भागीदारी करण्यास सुरुवात केली होती.

पण 14 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीतने डीप मीड विकेटला शॉट खेळला. त्यामुळे ती आणि ऋचा एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्यासाठी धावल्या. दुसरी धाव पूर्ण होईल असे वाटत असतानाच ऍश्ले गार्डनरने चेंडू अडवून यष्टीरक्षक एलिसा हेलीकडे फेकला. याचवेळी हरमनप्रीतची बॅट क्रिजच्या काहीशा अंतरावर बाहेर अडकली आणि तिचा पायही हवेत असतानाच हेलीने स्टंपवरील बेल्स उडवल्या.

त्यामुळे हरमनप्रीतला विकेट गमवावी लागली. 6 चौकार आणि 1 षटकारासह 34 चेंडूत 52 धावांची खेळी करून बाद झालेली हरमनप्रीत कौर या विकेटनंतर प्रचंड नाराज दिसली. तिने परत जाताना बॅटही चिडून फेकली. तिची ही विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली.

कारण ती बाद झाली तेव्हा भारताला 32 चेंडूत 40 धावांचीच गरज होती. पण ती बाद झाल्यानंतर ऋचाही 14 धावांवर बाद झाली. तसेच नंतर दीप्ती शर्मा नाबाद 20 धावांवर राहिली, तर स्नेह राणा 11 धावांवर आणि राधा यादव शुन्यावर बाद झाली. त्यांना भारताला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना भारतीय संघ 10 धावाच करू शकला.

ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि डार्सी ब्राऊन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शट आणि जेस जोनासनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने अर्धशतक करताना 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार मेग लेनिंगने 34 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. ऍश्ले गार्डनरनेही शानदार आक्रमक खेळी करताना 18 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावांची खेळी केली.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 बाद 172 धावा उभारल्या आणि भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून शिखा पांडेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT