IND vs PAK Live Streaming Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान थरार! टी20 विश्वचषकात रंगणार हाय-व्होल्टेज लढत; सामन्याच्या वेळेसह जाणून घ्या सर्व माहिती

Womens T20 World Cup 2026 India vs Pakistan: महिला टी20 विश्वचषकाचा थरार अधिकृतपणे सुरु झाला असून 12 जून ते 5 जुलैदरम्यान चालणाऱ्या या महाकुंभावर नाव कोरण्यासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत.

Manish Jadhav

Womens T20 World Cup 2026 India vs Pakistan: महिला टी20 विश्वचषकाचा थरार सुरु झाला असून 12 जून ते 5 जुलैदरम्यान चालणाऱ्या या महाकुंभावर नाव कोरण्यासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ या स्पर्धेत नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या संपूर्ण स्पर्धेत ज्या सामन्याची क्रीडाप्रेमी अत्यंत उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत आहेत, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मुकाबला.

भारतीय महिला संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबेस्टन मैदानावर हा रोमांचक सामना खेळवला जाणार असून दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये या सामन्याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

हा बहुप्रतीक्षित सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरु होईल. तत्पूर्वी, सामना सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 6:30 वाजता दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानावर येतील. या प्रतिष्ठेच्या विश्वचषकात भारतीय महिला संघाचे नेतृत्व धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ फातिमा सना हिच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ पाकिस्तानला (Pakistan) पहिल्याच सामन्यात धूळ चारुन स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरेल

जर तुम्हाला या रोमांचक सामन्याचा आनंद घरबसल्या घ्यायचा असेल, तर टीव्हीवर 'स्टार स्पोर्ट्स 1', 'स्टार स्पोर्ट्स 1 एचडी', 'स्टार स्पोर्ट्स 2', 'स्टार स्पोर्ट्स 2 एचडी' तसेच 'स्टार स्पोर्ट्स 3' या वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. याशिवाय, ज्या चाहत्यांना हा सामना आपल्या स्मार्टफोनवर किंवा मोबाईलवर पाहायचा आहे, त्यांच्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध आहे. या सामन्याचे डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंग 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) ॲपवर केले जाईल, त्यामुळे मोबाईल युझर्संना हा सामना पाहण्यासाठी हे ॲप इन्स्टॉल करावे लागेल.

इतिहास आणि हेड-टू-हेड रेकॉर्डचा विचार करायचा झाल्यास, भारतीय महिला संघाचे पारडे पाकिस्तानपेक्षा अत्यंत जड आणि मजबूत दिसते. 2009 मध्ये सुरु झालेल्या महिला टी20 विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या 9 आवृत्त्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकूण 8 वेळा आमनेसामने आले आहेत. या 8 सामन्यांपैकी तब्बल 6 सामन्यांत भारतीय संघाने दिमाखात विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ 2 सामन्यांत यश आले आहे. यापूर्वी 2024 च्या विश्वचषकात जेव्हा हे दोन संघ भिडले होते, तेव्हा भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता. हाच उत्कृष्ट रेकॉर्ड कायम ठेवत हरमनप्रीत कौरची 'वुमन्स इन ब्लू' यंदाही विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT