India vs Pakistan Semifinal 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Pakistan Semifinal 2026: दुबईमध्ये सुरु असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

Manish Jadhav

India vs Pakistan Semifinal 2026: दुबईमध्ये सुरु असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली. ग्रुप स्टेजमधील दोन्ही सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून 4 गुणांसह आणि सर्वोत्तम नेट रन रेटसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

दोन्ही देशांमधील हा महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 5 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना हा हाय-व्होल्टेज सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर थेट पाहता येणार आहे.

भारतीय संघाने (Team India) स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात थायलंडचा 94 धावांनी पराभव केला. या सामन्यात शफाली वर्माने 36 चेंडूंत 64 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, तर दिप्ती शर्माने एकही धाव न देता 3 बळी टिपले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा तब्बल 137 धावांनी धुव्वा उडवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 193 धावांचा डोंगर उभा केला, ज्याच्या प्रत्युत्तरादाखल हाँगकाँगचा संघ अवघ्या 56 धावांवर गारद झाला.

या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने 64 चेंडूंत 14 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 124 धावांची शतकी खेळी खेळली. या शतकासह स्मृतीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (18 शतके) ठोकण्याचा आणि सर्वाधिक धावांचा भारताची दिग्गज फलंदाज मिताली राज हिचा विक्रम मोडून इतिहास रचला.

फिरकीला अनुकूल असणाऱ्या दुबईच्या खेळपट्टीवर दिप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदनी शर्मा आणि श्री चरणी या भारतीय स्पिनर्सने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या 17 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी भारताने 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ 3 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. पाकिस्तानने भारताला शेवटचे 2022 मध्ये हरवले होते. सध्याच्या दोन्ही संघांच्या फॉर्मचा आणि आकडेवारीचा विचार करता भारतीय संघाचे पारडे अत्यंत जड मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT