Indian Women's Hockey Teams Dainik Gomantak
क्रीडा

Women Hockey Asian Champions Trophy 2023: आजपासून सुरु होतोय हॉकीचा 'महासंग्राम', पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women Hockey Asian Champions Trophy 2023: महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 आजपासून सुरु होत आहे.

Manish Jadhav

Women Hockey Asian Champions Trophy 2023: महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 आजपासून सुरु होत आहे. या चॅम्पियनशिपमध्ये एकूण 6 देश सहभागी होणार आहेत. याबाबत हॉकीप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

27 ऑक्टोबरपासून सुरु होणारी ही आशियाई चॅम्पियन हॉकी स्पर्धा 5 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्याचा अंतिम सामना 5 नोव्हेंबरला होणार आहे.

या चॅम्पियनशिपचा पहिला सामना आज दुपारी 4 वाजता जपानविरुद्ध मलेशिया यांच्यात होणार आहे. महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक येथे जाणून घ्या.

भारताचा पहिला सामना

महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताचा पहिला सामना रात्री 8:30 वाजता होणार आहे. हा सामना भारतविरुद्ध (India) थायलंड यांच्यात होणार आहे. महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्समध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे, तर थायलंड या क्रमवारीत 29 व्या स्थानावर आहे.

भारत शनिवारी या स्पर्धेतील दुसरा सामना 18व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व गोलरक्षक सविता पुनिया करणार आहे, तर बचावपटू दीप ग्रेस एक्का तिची उपकर्णधार असेल.

हे 6 संघ भाग घेत आहेत

महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेतील प्रत्येक सामना मरंग गोमके येथील जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, चाहते ते घरी बसूनही पाहू शकतात.

भारतीय दर्शकांना महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी लीग टप्प्यातील सामने संपल्यानंतर, शीर्ष चार संघ महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 उपांत्य फेरीत जातील.

उपांत्य फेरीतील पहिला आणि दुसरा सामना 4 नोव्हेंबरला होणार आहे. तर कांस्यपदकाचा सामना आणि अंतिम सामनाही 5 नोव्हेंबरला होणार आहे.

महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया आणि थायलंड (Thailand) यांचा समावेश आहे.

भारतीय संघ

सविता पुनिया (कर्णधार/गोलकीपर), बिचू देवी खरीबम (गोलकीपर), निक्की प्रधान (डिफेंडर), उदिता (डिफेंडर), इशिका चौधरी (डिफेंडर), दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार/डिफेंडर), निशा, सलीमा टेटे (मिडफिल्डर) , नेहा (मिडफिल्डर), नवनीत कौर (मिडफिल्डर), सोनिका (मिडफिल्डर), मोनिका (मिडफिल्डर), ज्योती (मिडफिल्डर), बलजीत कौर (मिडफिल्डर), लालरेमसियामी (फॉरवर्ड), संगीता कुमारी (फॉरवर्ड), दीपिका (फॉरवर्ड), वंदना. कटारिया (फॉरवर्ड)

हॉकी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

27 ऑक्टोबर (शुक्रवार): जपान विरुद्ध मलेशिया, दुपारी 4:00 वा

27 ऑक्टोबर, (शुक्रवार): चीन विरुद्ध दक्षिण कोरिया, संध्याकाळी 6:15 वा

27 ऑक्टोबर, (शुक्रवार): भारत विरुद्ध थायलंड, रात्री 8:30 वा

28 ऑक्टोबर, (शनिवार): जपान विरुद्ध दक्षिण कोरिया, दुपारी 4:00 वा

28 ऑक्टोबर, (शनिवार): थायलंड विरुद्ध चीन, संध्याकाळी 6:15 वा

28 ऑक्टोबर, (शनिवार): भारत विरुद्ध मलेशिया, रात्री 8:30 वा

30 ऑक्टोबर, (सोमवार): दक्षिण कोरिया विरुद्ध मलेशिया, दुपारी 4:00 वा

30 ऑक्टोबर, (सोमवार): थायलंड विरुद्ध जपान, संध्याकाळी 6:15 वा

30 ऑक्टोबर, (सोमवार): चीन विरुद्ध भारत, रात्री 8:30 वा

31 ऑक्टोबर, (मंगळवार): दक्षिण कोरिया विरुद्ध थायलंड, दुपारी 4:00 वा

31 ऑक्टोबर, (मंगळवार): मलेशिया विरुद्ध चीन, संध्याकाळी 6:15 वा

31 ऑक्टोबर, (मंगळवार): जपान विरुद्ध भारत, रात्री 8:30 वा

2 नोव्हेंबर, (गुरुवार): मलेशिया विरुद्ध थायलंड, दुपारी 4:00 वा

2 नोव्हेंबर, (गुरुवार): चीन विरुद्ध जपान, संध्याकाळी 6:15 वा

2 नोव्हेंबर, (गुरुवार): भारत विरुद्ध दक्षिण कोरिया, रात्री 8:30 वा

4 नोव्हेंबर, (शनिवार): पाचवे/सहावे स्थान वर्गीकरण सामना, दुपारी 3:30 वाजता

उपांत्य फेरी 1: 4 नोव्हेंबर, शनिवार, संध्याकाळी 6:00 वा

उपांत्य फेरी 2: 4 नोव्हेंबर, शनिवार, रात्री 8:30 वा

कांस्यपदक सामना: 5 नोव्हेंबर, रविवार, संध्याकाळी 6:00 वाजता

अंतिम: 5 नोव्हेंबर, रविवार, 8:30 PM

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT