FC Goa
FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाचा जेसूराज चेन्नईयीनशी करारबद्ध

दैनिक गोमंतक

पणजी: गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघातर्फे खेळलेला विंगर अलेक्झांडर रोमारियो जेसूराज याला चेन्नईयीन एफसीने करारबद्ध केले आहे. त्याचा करार बहुवर्षीय असल्याचे क्लबने नमूद केले. ( Winger Alexander Romario Jesuraj signed by Chennaiyin FC )

चेन्नईपासून 420 किलोमीटर दूर असलेल्या दिंडागुल येथील 25 वर्षीय जेसूराज रहिवासी आहे. चेन्नई सिटी व मोहन बागान संघातून खेळताना त्याने दोन वेळा आय-लीग विजेतेपदाचा मान मिळविला आहे. आयएसएल स्पर्धेत त्याने प्रथमच घरच्या संघाशी करार केला आहे.

रोमारियोमुळे आमच्या संघात आणखी वैविध्य आणि अनुभव येत आहे. आय-लीग विजेतेपदात त्याने चेन्नई सिटी व मोहन बागानसाठी मोलाची कामगिरी बजावली होती. तो तमिळनाडूचा असल्यामुळे आपल्या राज्यातील संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याला जबाबदारीची जाणीव राहील. त्याला चेन्नईयीन कुटुंबात सामावून घेताना आनंद होत आहे, असे संघाच्या सहमालक विता दाणी यांनी नमूद केले.

अनुभवी फुटबॉलपटू

जेसूराजने भारताच्या 13 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले असून वयाच्या 17 व्या वर्षी तो चेन्नई प्रीमियर लीगमध्ये ॲरोज एफसीतर्फे खेळला. 2017 मध्ये त्याला चेन्नई सिटी एफसीने करारबद्ध केले. या संघाकडून खेळताना त्याने 2019 मध्ये आय-लीग स्पर्धा जिंकली. तेव्हा त्याने 19 सामन्यांत दोन गोल केले होते. नंतर त्याला मोहन बागानने करारबद्ध केले. व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीत तो 89 सामने खेळला असून आठ गोल व सात असिस्ट अशी त्याची कामगिरी आहे.

एफसी गोवातर्फे छाप

2020 मध्ये मोहन बागानकडून खेळताना आय-लीग जिंकल्यानंतर एफसी गोवाने जेसूराजला लोनवर आपल्या संघात घेतले. बंगळूर एफसीविरुद्ध त्याने आयएसएल पदार्पण केले. एफसी गोवातर्फे 2021 मधील ड्युरँड कप विजेत्या संघातून खेळला. त्या स्पर्धेतील पाच सामन्यांत त्याने एक गोल केला. याशिवाय एएफसी चँपियन्स लीगमध्येही तो पाच सामने खेळला. गतमोसमात जेसूराज आयएसएल स्पर्धेत एफसी गोवातर्फे नऊ सामने खेळला व त्याने दोन गोल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT