Dayne coelho, Katya Ida Coelho, Pearl Colvalcar Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023 : सेलर कात्या कुएल्हो आशियाई स्पर्धेसाठी पात्र; पर्ल कोलवाळकर, डेन कुएल्हो यांना रौप्यपदक

‘वायएआय’ सेलिंग स्पर्धेत कात्याने महिला आयक्यू फॉईल प्रकारात सुवर्णपदक जिंकले

किशोर पेटकर

Asian Games 2023 : गोव्याची आघाडीची आंतरराष्ट्रीय महिला सेलर कात्या कुएल्हो हिने यावर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. भारतीय संघ निवड चाचणी असलेल्या ‘वायएआय’ सेलिंग स्पर्धेत कात्याने महिला आयक्यू फॉईल प्रकारात दबदबा राखताना सुवर्णपदक जिंकले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडीची ही शेवटची पात्रता फेरी होती. यापूर्वीच्या दोन्ही निवड चाचणी स्पर्धेत कात्या हिने अव्वल कामगिरी बजावली होती. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर सोमवारी स्पर्धेचा समारोप झाला.

गोमंतकीय सेलरच्या कामगिरीची माहिती गोवा यॉटिंग असोसिएशनतर्फे देण्यात आली. स्पर्धेत आयएनडब्ल्यूटीसी मांडवीचे प्रतिनिधित्व करताना अद्वैत मेनन याने मुलांच्या आयएलसीए 4 प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

तो सुद्धा या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अद्वैत याचे वडील नौदल अधिकारी असून गोव्यात कार्यरत आहेत.

पर्ल हिची चमक

मुलींच्या आयएलसीए 4 प्रकारातील शर्यतीत गोव्याची पर्ल कोलवाळकर हिने चमक दाखवताना रौप्यपदकापर्यंत प्रगती साधली. या कामगिरीमुळे तिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय सेलिंग संघातील राखीव खेळाडूंत स्थान मिळाले. दुसऱ्या निवड चाचणीतही पर्ल हिला रौप्यपदक मिळाले होते.

डेन याची संधी हुकली

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी घेतलेल्या तीन टप्प्यातील निवड चाचणीत गोव्याचा प्रमुख पुरुष सेलर याला डेंग्यूमुळे पहिला टप्पा हुकला होता. तिसऱ्या चाचणीत त्याने पुरुषांच्या आयक्यू फॉईल प्रकारात रौप्यपदक जिंकले, पण तो आशियाई संघात स्थान मिळवू शकला नाही.

आता त्याने 2024 मधील पॅरिस ऑलिंपिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

कात्या दुसऱ्यांदा ‘एशियाड’ खेळणार

यापूर्वी 2018 मधील जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत कात्या कुएल्हो सहभागी झाली होती. याशिवाय 2014 साली चीनमधील नँजिंग येथे झालेल्या यूथ ऑलिंपिकमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि यूथ ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारी ती एकमेव भारतीय महिला विंडसर्फर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT