Will Jacks Catch Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: भन्नाट! विल जॅक्स बनला 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही हैराण व्हाल...

Will Jacks Catch Video: द हंड्रेड स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर झालेल्या लंडन स्पिरिट आणि MI लंडन यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळाली.

Sameer Amunekar

द हंड्रेड स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर झालेल्या लंडन स्पिरिट आणि MI लंडन यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळाली. विल जॅक्सच्या अप्रतिम झेलाने आणि सिकंदर रझाच्या आक्रमक फलंदाजीने MI लंडनने 4 विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे MI लंडनने गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम केले.

विल जॅक्सचा झेल ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट

नाणेफेक जिंकून MI लंडनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लंडन स्पिरिटकडून लुहान-ड्रे प्रिटोरियसने आक्रमक सुरुवात करत संघाला वेगवान धावा करून दिल्या. त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अर्धशतक पूर्ण केले.

मात्र त्याची धडाकेबाज खेळी अधिक मोठी होण्याआधीच विल जॅक्सने सीमारेषेजवळ अप्रतिम झेल टिपत त्याचा डाव संपवला. प्रिटोरियसने 28 चेंडूत 52 धावांची खेळी केली. प्रिटोरियसच्या विकेटनंतर लंडन स्पिरिटचा डाव काहीसा मंदावला आणि त्यांनी निर्धारित 100 चेंडूत 5 बाद 160 धावा उभारल्या.

सिकंदर रझाची स्फोटक फलंदाजी

161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना MI लंडनची सुरुवात फारशी दमदार झाली नाही. विल जॅक्स आणि जेम्स व्हिन्स स्वस्तात बाद झाल्याने संघावर दबाव निर्माण झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि सॅम करन यांनी डाव सावरत महत्त्वाची भागीदारी केली.

करन बाद झाल्यानंतर सिकंदर रझाने मैदानात येत सामन्याचे चित्र बदलले. त्याने अवघ्या 16 चेंडूत 32 धावांची तुफानी खेळी करत चार षटकार ठोकले आणि विजयाचा पाया रचला. अखेरीस MI लंडनने 94 चेंडूत 164 धावा करत 4 विकेट्सने सामना आपल्या नावावर केला.

गुणतालिकेत दुसरे स्थान कायम

या विजयासह MI लंडनने स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला. सहा सामन्यांनंतर संघाच्या खात्यात 16 गुण जमा झाले असून गुणतालिकेत त्यांनी दुसरे स्थान कायम ठेवले आहे. अव्वल स्थानावर ट्रेंट रॉकेट्सचा संघ असून त्यांनी सहापैकी पाच सामने जिंकत 20 गुण मिळवले आहेत.

MI लंडनची ही कामगिरी स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली असून, विल जॅक्सचा अप्रतिम झेल आणि सिकंदर रझाची निर्णायक खेळी या सामन्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT