Hardik Pandya News | Hardik Pandya News | Latest Cricket News Updates Dainik Gomantak
क्रीडा

हार्दिक पंड्याचे भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन होणार?

पंड्याने नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

दैनिक गोमन्तक

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे होणाऱ्या शिबिरासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. पंड्याने नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पंड्या दोन दिवसांनी या कॅम्पमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. (Latest Cricket News Updates)

हे शिबिर प्रामुख्याने 2022 च्या T20 विश्वचषकासाठी आयोजित करण्यात आले आहे. T20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात (Australia) होणार आहे. आयपीएल 2022 पूर्वी या खेळाडूंचे शिबिर आयोजित केले जात आहे. (Hardik Pandya News Updates)

हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह
आयपीएलच्या (IPL) शेवटच्या सत्रात हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. T20 विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

हार्दिक पांड्याचे आंतरराष्ट्रीय करिअर
हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) भारतासाठी 11 कसोटी, 63 एकदिवसीय आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हार्दिक पांड्याने कसोटी सामन्यांमध्ये 532 धावा केल्या आहेत, तर त्याच्या नावावर एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 1286 धावा आणि 553 धावा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT