Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ben Stokes सोडणार CSK ची साथ? कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीमची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाले स्थान

आयपीएल प्लेऑफच्या पूर्वी इंग्लंडने आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

CSK All-Rounder Ben Stokes to return home before IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफमध्ये अद्याप पोहचलेला नसला, तरी प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. पण त्याआधीच त्यांना एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

चेन्नई जर प्लेऑफमध्ये पोहचले, तर त्यांच्यासाठी अष्टपैलू बेन स्टोक्स निवडीसाठी उपलब्ध राहणार नसल्याची शक्यता आहे. चेन्नईला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना 20 मे रोजी खेळायचा आहे. या सामन्यानंतर स्टोक्स इंग्लंडला परतणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्टोक्स इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आहे आणि इंग्लंडला 1 जूनपासून आयर्लंड विरुद्ध चार दिवसीय कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर 16 जूनपासून ऍशेस मालिकाही सुरू होणार आहे. त्यामुळे त्या सामन्यांच्या तयारीसाठी स्टोक्स आयपीएल प्लेऑफच्या आधी इंग्लंडला परतणार असल्याचे म्हटले जात आहे.

31 वर्षीय स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 लिलावातून 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण स्टोक्सने केवळ पहिले दोन सामने खेळले, ज्यात त्याला फलंदाजीत 7 आणि 8 धावा करता आल्या.

तसेच त्याने एकच षटक गोलंदाजी केली, ज्यात त्याने 18 धावा दिल्या होत्या. त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो खेळला नाही. आता तो त्या दुखापतीतून सावरला असला, तरी कसोटी मालिकांच्या तयारीसाठी मायदेशी परतणार आहे.

इंग्लंड संघाची घोषणा

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयर्लंडविरुद्ध 1 ते 4 जून दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणाही केली आहे. हा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे. तसेच ऑली पोप उपकर्णधार आहे. याशिवाय गोल्फ खेळताना झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जॉनी बेअरस्टोचे देखील इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन देखील असेल. मात्र, इंग्लंडसाठी मोठा धक्का असा की जोफ्रा आर्चरच्या उजव्या कोपराला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने तो उपलब्ध नाही.

  • आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक, झॅक क्रावली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT