Dinesh Karthik  Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs WI: DK चा अफलातून शॉट तुम्ही पाहिलायं का? Video Viral

Dinesh Karthik VIDEO: पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने शुक्रवारी वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव करुन 1-0 अशी आघाडी घेतली.

दैनिक गोमन्तक

Dinesh Karthik VIDEO: पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने शुक्रवारी वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव करुन 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून रवी बिश्नोई, रविचंद्रन अश्विन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताच्या विजयात दिनेश कार्तिकने आपला तोच फॉर्म दाखवला ज्यासाठी तो ओळखला जातो. कार्तिकने अवघ्या 19 चेंडूत 41 धावांची खेळी केली. भारताची धावसंख्या 6 विकेट्सवर 190 पर्यंत नेण्यात कार्तिकने मोलाची कामगिरी केली.

दरम्यान, कार्तिक द फिनिशरने आपल्या वेगवान इनिंगमध्ये 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. कार्तिकने 215.79 च्या स्ट्राइक रेटने धावा करत धमाका केला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अलीकडच्या काळात ऑर्थोडॉक्स शॉट्स मारण्यात माहीर आहे, परंतु या सामन्यात कार्तिकने असे काही केले की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

वास्तविक, कार्तिक त्याच्या फलंदाजीदरम्यान ऑर्थोडॉक्स शॉट्स मारताना दिसला. गोलंदाज ओबेद मॅकॉयच्या चेंडूवर कार्तिकने नव्या पद्धतीने फटका मारण्यासाठी शॉट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, कार्तिकचा हा आश्चर्यकारक फटका गोलंदाजाला पचवता आला नाही. नॉन स्ट्रायकिंग बॅट्समन अश्विनही कार्तिकच्या शॉटचे त्याच्याच शैलीत कौतुक करताना दिसला.

शेवटी, कार्तिकला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. कार्तिकने असे करुन दाखवून दिले आहे की, तो येत्या काळात भारतीय संघासाठी (Indian Team) निश्चितच फिनिशरची भूमिका बजावू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT