Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: पंतला वगळलं नाही, तर टिम इंडियात जागा न मिळण्याचं 'हे' आहे कारण

पंतला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी टिम इंडियात जागा न मिळण्यामागचे कारण समोर आले आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant: भारत विरुद्ध श्रीलंका संघात जानेवारी 2023 च्या सुरुवातीलाच मर्यादीत षटकांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत. 3 जानेवारीपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे, तर 10 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

दरम्यान, या दोन्ही मालिकांसाठी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसात पंतची मर्यादीत षटकांमधील कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. त्यामुळे काहींनी त्याला संघातून वगळले गेल्याचा अंदाज बांधला होता. तर काहींनी त्याला विश्रांती दिली असल्याचा कयास लावलेला.

पण आता असे समजत आहे की फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिका लक्षात घेता, पंतला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार पंतला गुडघ्यांची समस्या जाणवत आहे. त्याचमुळे त्याला एनसीएमध्ये पाठवले आहे. तिथे तो स्ट्रेंथअँड कंडिशनिंग सेशन करेल. तिथे त्याला दोन आवड्यांसाठी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगवर काम करावे लागणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. ही गोष्ट लक्षात घेता त्याला एनसीएमध्ये पाठवले असून त्याला यावर्षी 44 सामने खेळल्यानंतर विश्रांतीचीही गरज होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे या चार सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने जिंकून भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी आहे.

दुबईत धोनीबरोबर पंतचे ख्रिसमस सेलिब्रेशन

दरम्यान, पंतने काहीदिवसांपूर्वीच ख्रिसमसचे सेलिब्रेशन माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर दुबईत केले. त्याचे या सेलिब्रेशनदरम्यानचे काही फोटोही व्हायरल झाले होते. त्याने स्वत: देखील धोनीबरोबरचा फोटो शेअर करत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT