Argentina  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup उंचावण्यापूर्वी लिओनल मेस्सीला का घातलेला काळा कोट? घ्या जाणून

फिफा वर्ल्डकप उंचावताना मेस्सीने काळ्या रंगाचा कोट का घातलेला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये रविवारी फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 च्या गोल फरकाने पराभव केला आणि विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले. याबरोबरच लिओनेल मेस्सीचेही विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण झाले.

दरम्यान सामन्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीला कतारचे अमीर तमीम बीन हामीद अल थानी यांनी वर्ल्डकप उंचावण्यापूर्वी काळ्या रंगाचा एक कोट घातला होता. नंतर मेस्सीने हा कोट घालूनच वर्ल्डकप उंचावला. पण अनेकांना त्याला हा कोट का घातला गेला, त्यामागे काय कारण होते, असे अनेक प्रश्न पडले.

(Why Lionel Messi was presented a black robe after FIFA World Cup 2022 Final)

मेस्सीला जो कोट घालण्यात आला होता, त्याला बिस्त असे म्हटले जाते. अरब देशांमध्ये बिस्त हा पारंपारिक पुरुषांचा पोशाख आहे. तसेच तो उंटाचे केस आणि मेंढीच्या लोकरपासून बनलेला असतो. तसेच काही रिपोर्ट्सनुसार अरब देशातील राजघराण्यातील व्यक्ती, मान्यवर, नवरदेव एखाद्या विशेष कार्यक्रमांना बिश्त परिधान करतात.

त्यामुळे असा कयास लावला जात आहे की मेस्सीच्या सन्मानार्थ त्याला बिश्त घालण्यात आले होते. त्यानेही नंतर बिश्त घालून वर्ल्डकपबरोबर काही फोटो काढले. त्यानंतर त्याने बिश्त पुन्हा काढून ठेवला आणि अर्जेंटिनाच्या जर्सीवर वर्ल्डकप विजयाचा आनंद साजरा केला.

दरम्यान, 120 मिनिटाच्या खेळानंतरही अंतिम सामन्यात 3-3 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे पेनल्टी शुटआऊट घेण्यात आला. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. यात अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमी मार्टिनेझने फ्रान्सचे रोखलेले 2 गोल महत्त्वाचे ठरले.

तत्पूर्वी सामन्यात अर्जेंटिनाकडून मेस्सीने दोन आणि एंजेल डी मारियाने एक गोल केला होता. तसेच फ्रान्सकडून एमबाप्पेने सर्व 3 गोल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT