Joe Root - Ben Stokes X
क्रीडा

IND vs ENG: रांचीत शतक केल्यानंतर जो रुटने बेन स्टोक्सला करंगळी दाखवत का केलं सेलिब्रेशन, वाचा कारण

Joe Root pinky finger celebration: भारताविरुद्ध राेची कसोटीत शतक केल्यानंतर जो रुटने करंगळी दाखवत सेलिब्रेशन केलं होतं, त्यावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही करंगळी दाखवत प्रत्युत्तर दिले होते.

Pranali Kodre

Why Joe Root did ‘pinky finger’ celebration after his century during India vs England 4th Test in Ranchi :

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रांचीमध्ये शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने शतकी खेळी केली. दरम्यान, त्याच्या शतकी खेळीनंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनची सर्वाधिक चर्चा झाली.

या सामन्यात इंग्लंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता, परंतु त्यांनी पहिल्या तीन विकेट्स 57 धावातच गमावल्या. पण त्यानंतर शेवटपर्यंत जो रुटने एक बाजू सांभाळली. आधी त्याने जॉनी बेअरस्टोबरोबर (38) चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर त्याने ६ व्या विकेटसाठी बेन फोक्सबरोबर 113 धावांची भागीदारी केली. फोक्स 47 धावांवर बाद झाल्यानंतर ऑली रॉबिन्सनने त्याला चांगली साथ दिली. यादरम्यान, रुटने 219 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले.

रुटने शतक पूर्ण करत त्याचे हेल्मेट काढून बॅट उंचावत सेलिब्रेशन केले. पण यानंतर त्याने त्याच्या हाताची करंगळीही वर करून सेलिब्रेशन केले, त्याच्या या सेलिब्रेशनला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही प्रतिउत्तर देताना हात वर करून करंगळी दाखवली. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की नक्की त्यामागील कारण काय?

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अशाप्रकारे सेलिब्रेशन करण्याची रुट आणि स्टोक्सची पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी जुलै 2022 मध्ये जेव्हा भारतीय संघ 2021 मधील इंग्लंडविरुद्धचा कसोटी मालिकेतील उर्वरित एक सामना खेळण्यासाठी बर्मिंगघमला गेला होता. तेव्हा झालेल्या त्या कसोटीतही जो रुटने 142 धावांची मॅच विनिंग खेळी केल्यानंतर अशाप्रकारे ड्रेसिंग रुमच्या दिशेने करंगळी दाखवली होती.

सेलिब्रेशन मागील कारण

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार या सेलिब्रेशन मागे 'एल्विस' या चरित्रपटाचा संबंध आहे. हा चित्रपट अमेरिकन रॉकस्टार एल्विस पर्सीच्या जीवनावर अधारित आहे. पर्सीच्या अनेक ट्रेडमार्क स्टाईलपैकी करंगळी दाखवणे ही एक स्टाईल होती. त्याच्या या स्टाईलवरही त्याच्या चरित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

रुटने या सेलिब्रेशन मागील कारण सांगितले की 'मला वाटत नाही की मी काही रॉकस्टार सारखा आहे पण 10 सेकंदसाठी मी ते केले. बेन (स्टोक्स) एल्विस पर्सीचा चित्रपट एखाद्यादिवशी पाहातो आणि तो तशी कृती संपूर्ण आठवडाभर करत असतो. त्यामुळे हे त्याच्यासाठी होते.'

दरम्यान, रुटच्या शतकामुळे इंग्लंडने रांची कसोटीत पहिल्या डावात 104.4 षटकात सर्वबाद 353 धावा केल्या. इंग्लंडकडून रुटने 274 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 122 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रॉबिन्सनने 58 धावांची खेळी केली.

भारताकडून या डावात गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने ४ विकेट्स घेतल्या, तर आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने २ विकेट्स आणि आर अश्विनने १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT