Team India Dainik Gomantak
क्रीडा

केएल राहुल होणार उपकर्णधार? बीसीसीआयचा मोठा निर्णय!

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर टीम इंडियाच्या उपकर्णधाराची लवकरच घोषणा होऊ शकते आणि त्यात केएल राहुलचे (KL Rahul) नाव आघाडीवर आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय सुरु झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी एकदिवसीय संघाची कमान रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवली आहे. याआधी रोहितकडे टी20 संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले होते. आता प्रश्न उरतो की, रोहित शर्माचा उपकर्णधार कोण होणार? म्हणजे टीम इंडियाचा (Team India) पुढचा उपकर्णधार कोण होणार? मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर टीम इंडियाच्या उपकर्णधाराची लवकरच घोषणा होऊ शकते आणि त्यात केएल राहुलचे (KL Rahul) नाव आघाडीवर आहे.

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) उपकर्णधारपदी नियुक्ती होणार आहे. केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही उपकर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी केएल राहुलची उपकर्णधारपदी घोषणा केली जाईल. सध्या फक्त कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

केएल राहुल का होणार उपकर्णधार?

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केएल राहुल उपकर्णधार का होणार आहे, याचे कारण दिले आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'केएल राहुल उपकर्णधार असेल. पांढऱ्या चेंडूच्या खेळात तो बर्‍याच दिवसांपासून शानदार खेळ दाखवत आहे. त्याच्यात अजून 6-7 वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. त्याला पुढील कर्णधार म्हणून तयार केले जाऊ शकते. रोहित, विराट आणि द्रविड यांच्यासोबत तो खूप काही शिकू शकतो. विशेष म्हणजे केएल राहुलची कामगिरीही त्याला मोठा दावेदार बनवते. केएल राहुल इंग्लंड दौऱ्यापासून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्याची एकदिवसीय सरासरी सध्या सर्वोच्च आहे. तो गेल्या 2 वर्षांपासून एकदिवसीय सामन्यांमध्ये 61.92 च्या सरासरीने धावा करत आहे. उपकर्णधारपदासाठी ऋषभ पंतच्या नावाचीही चर्चा होती मात्र तो आता खूपच तरुण आहे.

रोहित शर्माला मिळाली कमांड

बीसीसीआयने बुधवारी मोठा निर्णय घेत विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरुन हटवले. वृत्तानुसार, कोहलीला एकदिवसीय कर्णधारपद सोडायचे नव्हते परंतु बोर्डाला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार हवा होता. बोर्डाने एकदिवसीय, टी20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले असून कसोटीचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक आणि विश्वचषक 2023 मध्ये संघाला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी रोहित शर्मावर असेल. भारतीय संघाने 2013 पासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT