Rachin Ravindra  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: इंग्लंडला पळता भुई थोडी करणाऱ्या रचिन रवींद्रच्या नावाशी तेंडुलकर-द्रविडचा थेट संबंध

Rachin Ravindra: रचिन रविंद्रने 2019 वर्ल्डकप फायनल भारतातून पाहिली होती, त्याच्या नावामागेचीही खास कहाणी आहे.

Pranali Kodre

Who is Rachin Ravindra?

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला गुरुवारी सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध दणक्यात विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडला 9 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या या विजयात डेवॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र या दोघांनी शतके करत मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, हा सामना सुरू असताना रचिन रविंद्रची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. डावखुरा अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या रचिनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता.

त्याने कॉनवेच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाची जबाबदारी सांभाळत कारकिर्दीतील पहिले वनडे शतकही साजरे केले. त्याने नाबाद 123 धावा केल्या आणि कॉनवेने नाबाद 152 धावा केल्या. याशिवाय रचिनने गोलंदाजी करताना 1 विकेटही घेतली. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

रचिनच्या नावामागची कहाणी

दरम्यान, रचिन हा न्यूझीलंडकडून खेळत असला, तरी तो भारतीय वंशाचा आहे. त्याचे आई-वडील दोघेही भारतीय वंशाचे आहे. त्याच्या वडीलांचे नाव रविंद्र कृष्णामुर्ती असून ते मुळचे भारतातील बंगळुरूचे आहेत. पण ते नंतर कामानिमित्त न्यूझीलंडला स्थायिक झाले.

ते पेशाने आर्किटेक्ट आहेत. ते कॉलेजमध्ये क्रिकेटही खेळले आहेत. तसेच ते भारताचे दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांचे मोठे चाहतेही आहेत. हेच कारण आहे की त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव रचिन असे ठेवले.

रचिन नावातील 'र' हे अक्षर राहुल द्रविडच्या नावातील आहे आणि 'चिन' ही अक्षरे सचिनच्या नावातील आहे. ही अक्षरे एकत्र करुन त्यांनी रचिन असे नाव ठेवले.

रचिनलाही पुढे जाऊन क्रिकेटचा लळा लागला आणि त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली. 23 वर्षीय रचिन आता न्यूझीलंड संघातीन उदयोन्मुख खेळाडू आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो.

विशेष म्हणजे गुरुवारीही त्याने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करण्यापूर्वी 10 षटके गोलंदाजी करत हॅरी ब्रुकची महत्त्वाची विकेट घेतली होती.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रचिनने कसोटी क्रिकेटमध्येही भारताविरुद्ध 2021 मध्ये पदार्पण केले होते. त्यावेळीही त्याने न्यूझीलंडसाठी चांगले योगदान दिले होते. त्याने न्यूझीलंडसाठी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हून अधिक सामने खेळले आहेत.

भारतातून पाहिलेली फायनल

रचिनबाबत एक खास गोष्ट अशी की त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला 2019 वर्ल्डकपचा अंतिम सामना बंगळुरूमधून पाहिला होता.

त्याने याबद्दल पीटीआयला माहिती दिली होती की त्याचे वडील काही युवा मुलांना घेऊन त्यावेळी बंगळुरूला आले होते. त्यावेळी रचिनही त्यांच्याबरोबर होता. त्यांनी स्टॉक एक्सचेंज बारमधून 2019 वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहिला होता. त्या सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT