shikhar dhawan 
क्रीडा

SL vs IND: श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार कोण? दोन दिग्गज खेळाडू शर्यतीत

दैनिक गोमंतक

जर श्रेयस अय्यर (Shreyash Iyer) जुलैमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यापर्यंत फिट होऊ शकला नाही तर अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि अष्टपैलू खेळाडू फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे भारतीय कर्णधाराच्या शर्यतीत असतील. भारताचा संघ श्रीलंकेत तीन टी -20 आणि तीन वनडे सामने खेळेल. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासारखे (Rohit Sharma) खेळाडू पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये राहतील. गोपनीयतेच्या अटीवर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) अधिका-यांनी एका माध्यमाला सांगितले, “ सामान्यत: अशा प्रकारच्या दुखापतीचे ऑपरेशन व पुनर्वसन व्हायला चार महिने लागतात त्यामुळे  श्रेयस श्रीलंकेच्या दौर्‍यापर्यंत पूर्णपणे फिट होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.(Who is the captain for Sri Lanka tour)

बीसीसीआयचे अधिकार म्हणाले," जर श्रेयस उपलब्ध असेल तर त्याची कर्णधारपदासाठी निवड होईल." त्याच्यानंतर आयपीएलमध्ये (IPL 2021) चांगली कामगिरी करणारा धवन आणि  हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील. नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमध्ये शिखरने शानदार कामगिरी केली होती. तो एक अनुभवी फलंदाज आहे आणि तो कर्णधार पदाच्या निवडीसाठी योग्य असेल. तो कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. याशिवाय गेल्या आठ वर्षांत त्याने भारतासाठीही उत्तम कामगिरी केली आहे. हार्दिक हा टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले नुकत्याच झालेल्या आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिकने गोलंदाजी केलेली नाही. परंतु तो संघात असणं महत्वाचं आहे.जर हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी मिळाली तर तो चांगली कामगिरी करेल.  

बीसीसीआय श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी वेगळी टीम पाठवणार आहे. कारण त्यावेळी भारताचा सर्वोत्कृष्ट संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर असेल, ज्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडू असतील. अशा परिस्थितीत निवड समिती श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी -20 मालिकेसाठी वेगळा भारतीय संघ निवडेल. खरं तर, कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) खेळाडूंना अलग ठेवणे आवश्यक आहे, यामुळे भारतीय संघ अल्प काळात एका देशातून दुसर्‍या देशात जाऊ शकत नाही. ऑगस्टमध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. 

संभाव्य संघ
पृथ्वी शॉ, शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या (कर्णधार), देवदत पडिककल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, संजू सॅमसन, मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चहर.

भारत विरुद्ध श्रीलंका तीन वन डे सामन्यांच्या मालिकेचे संभाव्य वेळापत्रक
पहिला सामना : 13 जुलै
दुसरा सामना : 16 जुलै
तिसरा सामना: 19जुलै

भारत विरुद्ध श्रीलंका तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेचे संभाव्य वेळापत्रक
पहिला टी- 20 सामनाः 22 जुलै
दुसरा टी -20 सामनाः 24 जुलै
तिसरा टी-20 सामनाः 27 जुलै

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: ॲम्ब्युलन्स बनली 'काळ', तीन दुचाकींना चिरडले, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; बंगळुरुतील रिचमंड सर्कलवर थरार

Goa Politics: "गोंयान सरकार म्हण व्यवस्थ असा किदें?", पोलीसच गुंड बनलेत, कायदा-सुव्यवस्था कोलमडलीये; युरी-सरदेसाईंचा थेट हल्ला

Viral Video: 'छोटा पॅकेट बडा धमाका'! सापावर भारी पडली चिमुरडी मांजर, दोघांमधील झुंज पाहून हैराण व्हाल

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंती; काणकोणात शोभायात्रेची तयारी जोरात Video

Ind vs SA WC Final 2025: वर्ल्डकप फायनलपूर्वी मोठी बातमी! लाल मातीची खेळपट्टी भारतासाठी ठरणार धोकादायक? Pitch Report आला समोर

SCROLL FOR NEXT