FIFA WC 2022 Trophy:  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA WC Opening Ceremony: फिफा वर्ल्डकपचे सामने, ओपनिंग सेरेमनी भारतात कुठे पाहाल?

नोरा फतेही, बीटीएस बँडमधील कलाकार परफॉर्म करणार

Akshay Nirmale

FIFA WC Opening Ceremony: कतारमध्ये आजपासून (20 नोव्हेंबर) पासून फुटबॉल वर्ल्डकपला सुरवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार विरूद्ध इक्वाडोर या संघांमध्ये होत आहे. या सामन्यापुर्वी स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी होईल. हा ओपनिंग सेरेमनी आणि सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतात कुठे, कसे पाहता येईल, याविषयी जाणून घेऊया.

भारतीय प्रमाणवेळेनुसार फिफा वर्ल्डकपचा ओपनिंग सेरेमनी सायंकाळी साडे सात वाजता सुरू होईल. त्यानंतर रात्री साडे नऊ वाजता यजमान कतार विरूद्ध इक्वाडोर सामन्यास सुरवात होईल.

हे असतील ओपनिंग सेरेमनीचे आकर्षण

ओपनिंग सेरेमनीचे सर्वात मोठे आकर्षण बीटीएस बँडमधील कलाकार असेल. कोरियन बँड BTS मधील स्टार जुंगकूक परफॉर्म करणार आहे.याशिवाय ब्लॅक आईड पीज आणि कोलंबियाचे कलाकार जे बल्विन यांचा कार्यक्रम असेल. नायजेरियन संगीतकार, गीतकार पॅट्रिक नॅमेका ओकोरी आणि अमेरिकन रॅपर लिल बेबी हे देखील असतील. याशिवाय भारतीय अभिनेत्री नोरा फतेहीचा जलवाही पाहायला मिळू शकतो. फिफाने गेल्या महिन्यात वर्ल्डकप अँथम साँग 'लाइट द स्काई' रीलीज केले होते. यातही नोरा फतेही दिसली होती.

या चॅनेलवर दिसणार सामने

फिफा वर्ल्डकपमधील सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे अधिकार स्पोर्ट्स 18 (Sports18) कडे आहेत. याशिवाय स्पोर्ट्स18 एचडी (Sports18 HD) चॅनलवरही ओपनिंग सेरेमनी आणि सामने पाहता येतील.

फोन किंवा लॅपटॉपवर कुठे पाहाल मॅच?

वर्ल्डकपमधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि ओपनिंग सेरेमनीचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमा (Jio Cinema) अॅपवर पाहता येईल. जियो सिनेमा अॅपवर सामने मोफत पाहता येतील. जियो सिनेमाच्या वेबसाईटवर लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरही मोफत मॅच पाहता येईल. जियो सिनेमा हा प्लॅटफॉर्म जियो (Jio), व्ही (Vi), एयरटेल (Airtel) आणि बीएसएनएल ( BSNL) ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. जियो सिनेमावर सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. इंग्रजीसह हिंदी, तमिळ, मल्याळम आणि बंगालीसह पाच भाषांमध्ये प्रेक्षकांना मॅचचा आनंद घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड! VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT