Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

कोहलीचा 'विराट' फॉर्म परत कधी येणार?

छोट्या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर विराट कोहली खूपच निराश दिसत होता.

दैनिक गोमन्तक

IPL 2022 मध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी कोहलीची टीम आरसीबीने पंजाब विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही, कोहली अवघ्या 20 धावा करून बाद झाला. (when will Virat Kohli regain his form)

छोट्या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर विराट कोहली खूपच निराश दिसत होता. विराट बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे, असे अनेक क्रिकेट प्रेमींचे म्हणणे आहे.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात आरसीबीसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या विराटची सुरुवात चांगली झाली होती. त्याने दोन शानदार चौकार आणि एक षटकार ठोकला, पण 14 चेंडूत 20 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह विराटकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करणाऱ्या चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली.

बाद झाल्यानंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परतला आणि डगआऊटमध्ये बसला होता. यावेळीही त्याचा नशिबावर विश्वास बसत नव्हता. यावेळीही कोहलीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती, असे दर्शकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक सामन्यांपासून विराट सुरुवातीला चांगली फलंदाजी करतो, पण त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होताच तो बाद होतो. या सामन्यातही विराट चांगली सुरुवात केल्यानंतर बाद झाला.

आरसीबीने हा सामना 54 धावांनी गमावला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 209 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 155 धावाच करू शकला आणि 54 धावांनी सामना गमावला. पंजाबकडून जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शानदार फलंदाजी केली. बेअरस्टोने 66 तर लिव्हिंगस्टोनने 70 धावा केल्या. त्याचवेळी हर्षल पटेलने चार विकेट घेतल्या. वनिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT