Virat kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: विराट कोहली आपल्या गोलंदाजासाठी प्रेक्षकांशी भिडला, व्हिडिओ व्हायरल

सराव सामन्यादरम्यान काही प्रेक्षक कमलेशला त्रास देत होते. ते पाहून विराटने प्रेक्षकांना बोलायला सुरवात केली

दैनिक गोमन्तक

Virat Kohli Video England vs India: टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येथे संघाला कसोटी सामन्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी एक सराव सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान माजी कर्णधार विराट कोहली प्रेक्षकांशी वाद घालताना दिसला. या दौऱ्यावर टीम इंडियाने कमलेश नागरकोटीलाही घेतले आहे. तो नेट बॉलर म्हणून संघात सामिल झाला आहे. सराव सामन्यादरम्यान काही प्रेक्षक कमलेशला त्रास देत होते. ते पाहून विराटने प्रेक्षकांना बोलायला सुरवात केली आणि तो चिडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघ लीसेस्टरशायरसोबत सराव सामना खेळत आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या संघात सहभागी झाले होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेले काही प्रेक्षक कमलेश नागरकोटीला त्रास देत होते. हे पाहून विराटने त्याला अडवले आणि कमलेशला त्रास देऊ नका असे सांगितले. कोहली म्हणाला, “तो इथे तुमच्यासाठी सामना खेळायला आलेला नाही.” कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे सराव सामन्यात अनेक भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. संघाचा नवा खेळाडू श्रीकर भरत चांगल्या फॉर्मात दिसत होता. त्याने पहिल्या डावात नाबाद 70 धावा केल्या. भरतच्या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसऱ्या डावात त्याने 43 धावा केल्या. मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी 2-2 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT