Ranji Trophy 2022 Final: शुभम शर्माने झळकावले शानदार शतक, पाहा कसे मारले 15 चौकार

रणजी ट्रॉफी 2021-22 चा अंतिम सामना मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात खेळला जात आहे.
Shubham Sharma
Shubham SharmaTwitter
Published on
Updated on

रणजी ट्रॉफी 2021-22 (Ranji Trophy 2022) चा अंतिम सामना मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद 374 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून एमपीच्या खेळाडूंनी पहिल्या डावात 300 हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान यश दुबे संघासाठी शतकानंतर नाबाद खेळत आहे. तर शुभम शर्मा (Shubham Sharma) शतकानंतर बाद झाला. फलंदाजी करताना त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला. शुभमने चौकार मारून शतक पूर्ण केले. (Ranji Trophy 2022 Final)

मध्य प्रदेशसाठी पहिल्या डावात यश आणि हिमांशू सर्वप्रथम खेळण्यासाठी आले. यादरम्यान हिमांशू अवघ्या 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद झाल्यानंतर शुभमन मैदानावर पोहोचला. त्याने यशसोबत दमदार भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी शतके झळकावली. यश शतकी खेळीनंतरही खेळत आहे. या खेळीत त्याने 12 चौकार मारले आहेत. तर शुभम शतकानंतर बाद झाला.

Shubham Sharma
...तर प्रश्न उपस्थित होणार, विराट नंतर कपिल देव यांनी रोहितला फटकारले

शुभमने 215 चेंडूत 116 धावा केल्या. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शुभमने अखेर चौकार मारून शतक पूर्ण केले. अशाप्रकारे मध्य प्रदेशने पहिल्या डावात 300 हून अधिक धावा केल्या आहेत. संघाचा सर्वोत्तम खेळाडू रजत पाटीदार अर्धशतकांसह क्रीजवर उपस्थित होता.

Shubham Sharma
Olympics 2036चं भारतात होणार आयोजन? रशिया मदत करण्यास तयार

विशेष म्हणजे मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद 374 धावा केल्या होत्या. यादरम्यान सर्फराज खानने शतक झळकावले. त्याने 243 चेंडूत 134 धावा केल्या. सरफराजच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यशस्वी जैस्वालनेही चांगली खेळी केली. त्याने 163 चेंडूत 78 धावा केल्या. यशस्वीच्या खेळीत 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com