Rohit Sharma Virat Kohli
Rohit Sharma Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

काय आहे स्लो ओव्हर रेट नियम, ज्यामुळे IPL 2023 कर्णधारांना झालाय लाखोंचा दंड?

Pranali Kodre

Slow Over Rate rule in IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत काही संघांच्या कर्णधारांवर दंडाची कारवाई झाल्याचे अनेकांनी ऐकले असेल. या कर्णधारांवर आयपीएलच्या आचार संहितेमधील षटकांच्या गतीचा नियमभंग केल्या प्रकरणी दंडाची कारवाई झाली. पण षटकांची गतीचा नक्की नियम आहे काय? असा प्रश्न अनेकांनाच पडला असेल, याबद्दलच जाणून घेऊ.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला त्यांच्या डावातील 20 षटके 90 मिनिटांच्या आत पूर्ण करणे बंधणकारण आहे. यामध्ये अडीच-अडीच मिनिटांच्या दोन स्ट्रॅटर्जिक टाईम-आऊटचाही समावेश आहे. तसेच डिआरएस रिव्ह्यू किंवा खेळाडूंच्या दुखापतीमुळे गेलेला कालावधी यामध्ये गणला जात नाही.

पण जर संघांकडून 90 मिनिटांच्या आत पूर्ण 20 षटके टाकली गेली नाही, तर षटकांची गती कमी राखण्यासाठी संघावर आणि कर्णधारावर कारवाई करण्यात येते. जर संघाकडून पहिल्यांदा अशी चूक झाल्यास केवळ कर्णधारावर 12 लाखांच्या दंडाची कारवाई होते. संघातील इतर खेळाडूंना दंड होत नाही.

पण दुसऱ्यांदा षटकांची गती कमी राखली गेल्यास मात्र, त्या संघाच्या कर्णधाराला २४ लाखांचा दंड होते. तसेच त्या सामन्यात खेळलेल्या त्या संघातील सर्व 11 खेळाडू आणि इम्पॅक्ट प्लेअरवरही दंडाची कारवाई होते. त्यांना 6 लाख किंवा सामनाशुल्काच्या 25 टक्के, जी किंमत कमी असेल, तो दंड भरावा लागतो.

तसेच तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास संघाच्या कर्णधारावर 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी कारवाई केली जाते. तसेच संघातील खेळाडूंवर 12 लाखांचा किंवा सामनाशुल्काच्या 50 टक्के, जी किंमत कमी असेल, तो दंड भरावा लागतो. हीच कारवाई नंतर प्रत्येक षटकांची गती कमी राखण्याच्या चूकीसाठी लागू होते.

इतकेच नाही, जर कर्णधारांनी चतुराई दाखवत बंदी टाळण्यासाठी दुसऱ्या खेळाडूकडे नेतृत्व सोपवले तरी, जोपर्यंत बीसीसीआयला नेतृत्वातील औपचारिक बदलाबाबत लेखी कळवले जात नाही, तोपर्यंत त्याच्यावर निर्बंध लागू राहतात.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की यंदा आयपीएलमध्ये असाही नियम आहे की संघांनी निर्धारित वेळत षटके टाकली नाहीत, तर उशीराने टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघांना कारवाई म्हणून केवळ चारच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत.

दरम्यान, यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल यांना देखील आयपीएल 2023 हंगामात षटकांची गती कमी राखल्यामुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून दुसऱ्यांदा षटकांची गती कमी राखली गेल्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर प्रभारी कर्णधार विराट कोहलीवर 24 लाखांचा दंड आणि संघावरही दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

Crime News : फोंड्यातील घटना डोक्यात दगड घालून मामाकडून भाच्याचा खून

SCROLL FOR NEXT