India Hockey Team  Dainik Gomantak
क्रीडा

Hockey World Cup 2023: भारत-इंग्लंड संघात क्वार्टर-फायनलमध्ये थेट एन्ट्रीसाठी चढाओढ, असे आहे समीकरण

भारत आणि इंग्लंड संघामध्ये गुरुवारी हॉकी वर्ल्डकपच्या क्वार्टर-फायनलमध्ये थेट प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

Pranali Kodre

Hockey World Cup 2023: भारतात सुरू असलेल्या हॉकी वर्ल्डकपमध्ये सध्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशासाठी संघांची चढाओढ सुरू आहे. गुरुवारी डी ग्रुपच्या होणाऱ्या साखळी सामन्यांदरम्यान देखील भारत आणि इंग्लंड या संघांचा उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

गुरुवारी इंग्लंडचा सामना स्पेनविरुद्ध संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे, तर भारताचा सामना वेल्सविरुद्ध संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी डी ग्रुपमध्ये पहिल्या तीन संघांमध्ये जागा पक्की केली आहे. पण गुरुवारी या दोन्ही संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी जागा पक्की करण्याची संधी आहे.

हॉकी वर्ल्डकप 2023 च्या नियमानुसार चार ग्रुपमधील अव्वल क्रमांक मिळणारे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तर ग्रुपमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना क्रॉस ओव्हरची फेरी खेळावी लागणार आहे. त्यातून जे चार संघ पुढे येतील ते उपांत्यपूर्व फेरी खेळतील.

असे आहे ग्रुप डीचे समीकरण

सध्या ग्रुप डीमध्ये इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांचे 2 सामन्यांमध्ये एक विजय आणि एका बरोबरीसह 4 गुण आहेत. पण गोल फरकामुळे इंग्लंड अव्वल क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच स्पेन एक विजय आणि एक पराभवासह 3 गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण वेल्सने त्यांचे दोन्ही सामने पराभूत झाल्याने अखेरच्या स्थानावर आहे.

त्यामुळे गुरुवारी, इंग्लंड विरुद्ध स्पेन यांच्यातील सामन्यानंतर भारताला ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी कसे समीकरण असेल, हे स्पष्ट होईल. या सामन्यात जर इंग्लंडने स्पेनला पराभूत केले, तर भारताला डी ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी वेल्सला पराभूत तर करावे लागेलच, पण इंग्लंडच्या गोलफरकालाही मागे टाकावे लागेल.

मात्र, जर इंग्लंड स्पेनविरुद्ध पराभूत झाले, तर भारतीय संघ फक्त वेल्सवर कोणत्याही गोलफरकाने विजय झाला, तरी अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश करेल.

पण, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारताला जरी ग्रुप डीमध्ये अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश करता आला नाही, तरी क्रॉसओव्हर फेरी खेळून त्यांच्याकडे उपांत्यपूर्व सामना खेळण्याची संधी असेल.

असा असू शकतो भारताचा पुढील मार्ग

जर भारताने ग्रुप डीमध्ये अव्वल स्थान मिळवले, तर भारतीय संघ थेट उपांत्य पूर्व फेरीचा सामना खेळेल. भारताचा हा सामना क्रॉसओव्हर फेरीत ग्रुप बीमधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि ग्रुप ए मधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ यांच्यातील सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाविरुद्ध होईल.

पण, जर भारत ग्रुप डी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर भारताला क्रॉस ओव्हर फेरीत 22 जानेवारी रोजी ग्रुप सीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाशी सामना खेळावा लागेल. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.

तसेच जर भारत ग्रुप डी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला, तर भारताला क्रॉस ओव्हर फेरीत 22 जानेवारी रोजी ग्रुप सीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाशी सामना खेळावा लागेल. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT