What did Irfan Pathan say that made Amit Mishra angry  Dainik Gomantak
क्रीडा

भारतासाठी खेळणारे क्रिकेटर जेव्हा ट्विटरवर भांडतात तेव्हा चर्चा तर होणारच...

इरफान पठाण काय म्हणाला, ज्यामुळे अमित मिश्रा रागावला?

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने शुक्रवारी असे ट्विट केले होते, ज्यामुळे क्रिडा क्षेत्रात खळबळ उडाली होती. इरफान पठाणच्या या ट्विटवर फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) भडकला आणि त्याने चोख प्रत्युत्तर दिले. हे ट्विट (Tweet) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. भारताचे दोन दिग्गज (Indian Cricketer) खेळाडू ट्विटरवर का भिडले हे जाणून घेण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. (Irfan Pathan News)

इरफान पठाणने काय ट्विट केले

माजी अष्टपैलू इरफान पठाणने शुक्रवारी सकाळी ट्विट केले आणि लिहिले, "माझा देश, माझा सुंदर देश, या देशामध्ये जगातील महान देश बनण्याची क्षमता आहे, परंतु..." इरफानने आपला मुद्दा अपूर्ण ठेवला आणि पुढे काही लिहिले नाही. तो हे कोणत्या संदर्भात बोलला? इरफानचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. दुपारपर्यंत हे ट्विट चर्चेत आले आणि त्यानंतर फिरकीपटू अमित मिश्राने त्यावर प्रतिक्रिया दिली.

असे उत्तर अमित मिश्रा यांनी दिले

इरफान पठाणच्या ट्विटनंतर अमित मिश्राने शुक्रवारी दुपारी एक ट्विट केले. त्यांनी लिहिले, "माझा देश, माझा सुंदर देश, त्यात जगातील महान देश बनण्याची क्षमता आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा काही लोकांना समजेल की आपली राज्यघटना हे पहिले पुस्तक आहे ज्याचे पालन केले पाहिजे."

अमित मिश्राने हे ट्विट करताच लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. काही लोक इरफान पठाणच्या बाजूने उतरले तर काही लोकांनी अमित मिश्राला समर्थन दिले. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सहसा कधी एकाच देशाकडून खेळणारे खेळाडू ट्विटरवर भांडतात तेव्हा नक्कीच सोशल मिडियावर चर्चा तर होणार. मात्र, अद्यापपर्यंत इरफान पठाणने अमित मिश्राला उत्तर दिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT