सचिन तेंडुलकरने मुंबईच्या पराभवावर सोडले मौन, म्हणाला- विजयासाठी...

आव्हानात्मक परिस्थीती असतानाही खेळाडूंनी खूप मेहनत घेतली
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

चेन्नई सुपर किंग्ज (MI) ने गुरुवारी IPL मध्ये मुंबई इंडियन्स (MI) चा पराभव केला. या मोसमात मुंबईचा हा सलग सातवा पराभव ठरला. या पराभवामुळे मुंबईचा प्लेऑफचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. आता मुंबईचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने संघाच्या कामगिरीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तेंडुलकरने T20 ला 'क्रूर' फॉरमॅट असे वर्णन केले आहे, ज्यामध्ये छोट्या चुकाही जड होतात. पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन्सना त्याने महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे.

Sachin Tendulkar
हार्दिक पांड्या परतणार, कोलकाता टीममध्ये फलंदाजीत अजूनही बदल नाही

सचिन तेंडुलकर म्हणाला, "अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करून सामने जिंकता येतात. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हानात्मक मोसम असतानाही खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. तरुण संघ स्थिर व्हायला वेळ लागेल, पण अशा वेळी तुम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहून उपाय शोधू शकता.

पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जकडून तीन गडी राखून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे, असे इंग्लंडचा माजी ऑफस्पिनर ग्रॅमी स्वान याला वाटते. मुंबईचा स्पर्धेतील हा सलग सातवा पराभव असल्याने गुणतालिकेत ते तळाशी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com