West Indies X/windiescricket
क्रीडा

WI vs ENG: विंडीजने उडवली इंग्लंडची धुळधाण! पाचवी T20 जिंकत मालिकाही टाकली खिशात

West Indies vs England: वेस्ट इंडिजने इंग्लंडला वनडे पाठोपाठ टी20 मालिकेतही पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

West Indies vs England, 5th T20I at Trinidad:

इंग्लंडसाठी नुकताच केलेला वेस्ट इंडिज दौरा फारसा चांगला राहिलेला नाही. या दौऱ्यात त्यांना वनडे मालिका गमावल्यानंतर टी20 मालिकेतही पराभव स्विकारावा लागला आहे. वेस्ट इंडिजने गुरुवारी (21 डिसेंबर) इंग्लंडला टी20 मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केले आहे. याबरोबरच टी20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली.

त्रिनिदादला झालेल्या पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला 133 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान वेस्ट इंडिजने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. शाय होपने वेस्ट इंडिजसाठी विजयी षटकार खेचला. तर या सामन्यात 3 विकेट्स घेणारा गुडाकेश मोती सामनावीर ठरला.

या सामन्यात १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी 33 धावांवरच 2 विकेट्स गमावल्या होत्या. ब्रेंडन किंग 3 धावांवरच, तर निकोलस पूरन 10 धावांवर बाद झाला.

त्याचबरोबर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जॉन्सन चार्ल्सनेही 27 धावांवर विकेट गमावली. पण नंतर शाय होप आणि शेर्फेन रुदरफोर्ड यांनी डाव सावरला. पण रुदरफोर्ड 30 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार रोवमन पॉवेल आणि आंद्रे रसेलचीही विकेट वेस्ट इंडिजने झटपट गमावली.

त्यामुळे अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला 9 धावांची गरज होती. या षटकात पहिल्या चेंडूवर जेसन होल्डरने होपसह 3 धावा पळून काढल्या. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर होपने षटकार मारत वेस्ट इंडिजचा विजय पक्का केला. होप 43 चेंडूत 43 धावांवर नाबाद राहिला, तर होल्डर 4 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून गोलंदाजीत रिस टोप्ली आणि आदील राशिद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडकडून फिल सॉल्ट आणि जोस बटलरने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, बटलर चौथ्या षटकात 11 धावांवर बाद झाला. त्यांनंतर मात्र इंग्लंडने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 22 चेंडूत सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तसेच लियाम लिव्हिंगस्टोनने 28 धावा केल्या.

तसेच मोईन अलीने 23 धावांची खेळी केली, तर सॅम करनने 12 धावा केल्या. या पाच जणांव्यतिरिक्त कोणीही दोन आकडी धावसंख्या गाठली नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ 19.3 षटकात 132 धावांवर सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने 4 षटकात 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच जेसन होल्डर, अकिल हुसैन आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

मालिकावीर

या मालिकेतील मालिकावीरचा पुरस्कार इंग्लंडच्या फिल सॉल्टला मिळाला. त्याने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 5 सामन्यांत 2 शतकांसह 331 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT