West Indies vs Zimbabwe 
क्रीडा

West Indies vs Zimbabwe: वानखेडेवर षटकारांचं पाऊस! विंडीज-झिम्बाब्वे सामन्यात मोडला 12 वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; पहिल्यांदाच घडला 'असा' चमत्कार VIDEO

Cricket World Record Broken 2026: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील सुपर 8 चा सामना वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

West Indies vs Zimbabwe, T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील सुपर 8 चा सामना वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने एक मेजवानी ठरला, कारण मैदानात चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला.

वेस्ट इंडिजने (West Indies) झिम्बाब्वेविरुद्ध 107 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपला दावा अधिक मजबूत केला. मात्र या विजयापेक्षाही जास्त चर्चा या सामन्यात प्रस्थापित झालेल्या एका नव्या जागतिक विक्रमाची होत आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी मिळून टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेला कारनामा करुन दाखवला असून, 12 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला.

या सामन्यात एकूण 31 षटकार ठोकले गेले, जो टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील एका सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा नवा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी 2014 मध्ये आयर्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात 30 षटकार लागले होते. क्रिकेटच्या या महाकुंभात एकाच सामन्यात 30 पेक्षा जास्त षटकार लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 बाद 254 धावांचा डोंगर उभा केला. हा धावसंख्या या विश्वचषकातील सर्वोच्च आणि टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यांच्या डावात एकूण 19 षटकार लगावले, ज्याद्वारे त्यांनी टी-20 वर्ल्ड कपच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. 255 धावांच्या महाप्रचंड आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ पूर्णपणे दबावाखाली आला. असे असले तरी, झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न सोडला नाही. ब्रॅड इव्हान्सने अवघ्या 21 चेंडूत 43 धावांची झुंजार खेळी खेळली, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. झिम्बाब्वेच्या संपूर्ण संघाने मिळून 12 षटकार लगावले. अशाप्रकारे दोन्ही संघांच्या षटकारांची बेरीज 31 वर पोहोचली आणि क्रिकेटच्या पुस्तकात एका सुवर्ण विक्रमाची नोंद झाली.

झिम्बाब्वेचा (Zimbabwe) डाव 17.4 षटकांत 147 धावांवर आटोपला आणि वेस्ट इंडिजने एकतर्फी विजय साकारला. या विजयासह वेस्ट इंडिजने स्पर्धेत सलग 5 विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. कॅरेबियन संघाचा हा फॉर्म पाहता ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता यापुढील प्रवासात त्यांचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांशी होणार आहे. या सामन्याने हे सिद्ध केले की, आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजीची ताकद कोणत्या स्तरावर पोहोचली आहे आणि वानखेडेसारखे छोटे मैदान जेव्हा फलंदाजांना साथ देते, तेव्हा गोलंदाजांसाठी बचावाचा कोणताही मार्ग उरत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT