India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 3rd T20I: मॅचपूर्वी सावळा गोंधळ! मैदानातून '30 यार्ड सर्कल'च गायब, वाचा नक्की झालं काय

West Indies vs India: तिसऱ्या टी20 सामन्याला सुरुवात होण्याआधीच मैदानात आलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज खेळाडूंना काही वेळासाठी माघारी परतावे लागले होते.

Pranali Kodre

West Indies vs India, 3rd T20I at Providence Stadium, Guyana, 30 yard circle missing:

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सध्या सुरू असून तिसरा सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) होत आहे. हा सामना गयानामधील प्रोविडन्स स्टेडियमवर खेळवला जात असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या सामन्याला सुरुवात होण्यासाठी काही मिनिटांचा उशीर झाला. यामागे एक विचित्र कारण पाहायला मिळाले. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मैदानात 30 यार्ड सर्कल अधोरेखीतच करण्यात आले नव्हते.

खरंतर ही आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदान सज्ज करताना ग्राउंड्समनकडून करण्यात येणारी मुलभूत गोष्ट आहे. मात्र असे असतानाही ३० यार्ड सर्कल दाखवण्यासाठी कोणतीही खूण ठेवण्यात आली नव्हती. पण यामुळे भारतीय संघ पंचांबरोबर चर्चा केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतला.

त्यानंतर लगेचच ग्राउंड्समनला बोलावून हे काम काही मिनिटाच्या आतच करून घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू पुन्हा मैदानात आले आणि लगेचच ५ मिनिटांनी सामना सुरू झाला. पण आता ही चूक कशी घडली, याबद्दल माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, या सामन्यातून भारताकडून यशस्वी जयस्वालचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. जयस्वाल भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 105 वा खेळाडू ठरला आहे.

तसेच कुलदीप यादवचेही पुनरागमन झाले आहे. मात्र इशान किशन आणि रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमधील जागा सोडावी लागली आहे. त्यामुळे या सामन्यात भारताकडून संजू सॅमसन यष्टीरक्षण केले.

तसेच वेस्ट इंडिजने जेसन होल्डर ऐवजी रोस्टन चेसला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार

  • वेस्ट इंडिज - ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT