Team India Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 3rd T20I: 'करो वा मरो' मॅचमध्ये तरी जयस्वालला संधी मिळणार? अशी असेल टीम इंडियाची संभाव्य 'प्लेइंग-11'

West Indies vs India: वेस्ट इंडिजविरुद्ध मंगळवारी होणारा तिसरा टी20 सामना भारतासाठी निर्णायक असणार आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 3rd T20I, Probable Playing XI : वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सध्या सुरू असून तिसरा सामना मंगळवारी (८ ऑगस्ट) होणार आहे. हा सामना हा सामना गयानामधील प्रोविडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल.

भारतासाठी करो वा मरो

हा सामना भारतासाठी निर्णायक सामना असणार आहे. कारण या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने केवळ ४ धावांनी गमावला होता, तर दुसरा सामना भारताला २ विकेट्सने गमवावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजने २-० अशी आघाडी घेतली आहे.

त्याचमुळे तिसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिजने विजय मिळवला, तर वेस्ट इंडिज ही मालिकाही खिशात घालेल. मात्र, भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध २०१७ नंतर पहिल्यांदाच मालिका गमवावी लागेल. पण जर भारताने तिसरा सामना जिंकला, तर भारताचे आव्हान कायम राहिल.

कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजीत संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन एक फिरकी गोलंदाजाला किंवा संजू सॅमसनला वगळून यशस्वी जयस्वालला तिसऱ्या टी२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतात. असे झाले, तर जयस्वालचे हे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणही ठरेल.

संजू सॅमसनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चांगली झालेली नाही, त्यामुळे त्याला जागा गमवावी लागू शकते. तसेच दुसऱ्या सामन्यात भारताने अक्षर पटेलला गोलंदाजी दिली नव्हती. केवळ रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल यांनीच गोलंदाजी केली होती. त्यामुळे जर भारतीय संघ व्यवस्थापन बिश्नाईला बाहेर करण्याचाही विचार करू शकतात.

भारताकडून फलंदाजी फळीत इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हे कायम राहू शकतात. तसेच कर्णधार हार्दिक पंड्याही फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत योगदान देऊ शकतो. वेगवान गोलंदाजांच्या फळीतरीही अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार कायम राहू शकतात.

भारताकडे तिलक वर्माच्या रुपात एक पार्ट टाईम गोलंदाजाचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जर संघात दोन फिरकी गोलंदाजच खेळवले, तर एक अतिरिक्त फलंदाजाला खेळवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकेल.

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई / यशस्वी जयस्वाल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT