Mukesh Kumar | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Mukesh Kumar: 'येस बॉय...!' मुकेशने पहिली इंटरनॅशनल विकेट घेताच विराटचं मन जिंकणारं सेलिब्रेशन, पाहा Video

Pranali Kodre

Virat Kohli Celebration after Mukesh Kumar maiden International wicket: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे गुरुवारपासून (20 जुलै) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातून भारताकडून 29 वर्षीय मुकेश कुमारने पदार्पण केले आहे.

वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसाठी या सामन्याचा तिसरा दिवस खास ठरला. कारण तिसऱ्या दिवशी मुकेशला पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली. त्याला विकेट मिळाल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही जोरदार सेलिब्रेशन केले.

या सामन्यात तिसऱ्या दिवसाची वेस्ट इंडिजने 42 षटकापासून आणि 1 बाद 86 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यावेळी दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेला वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने किर्क मॅकेन्झीला साथीला घेत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मॅकेन्झीने तिसऱ्या दिवशी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे ब्रेथवेट आणि मॅकेन्झीची जोडी धोकायदायक ठरण्याची शक्यता होती. पण अखेर ५२ व्या षटकात मुकेश कुमारने मॅकेन्झीचा अडथळा दूर केला. त्याने टाकलेल्या चेंडूवर मॅकेन्झीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे यष्टीरक्षक ईशान किशनकडे गेला. ईशाननेही सहज झेल घेतला.

हा झेल घेताच मुकेश कुमारसह भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनवेळी विराटने सर्वात आधी मुकेशचे अभिनंदन करताना त्याला मिठी मारली. मॅकेन्झी 57 चेंडूच 4 चौकार आणि 1 षटकारांसह 32 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे याच सामन्यातून मॅकेन्झी आणि मुकेश दोघांनी पदार्पण केले आहे.

दरम्यान, या विकेटनंतर जवळपास एक तासासाठी सामना पावसाच्या अडथळ्यामुळे थांबला होता. पण नंतर पुन्हा सामना सुरु झाला. दरम्यान वेस्ट इंडिजकडून कर्णधार ब्रेथवेटने अर्धशतकी खेळी केली. पण त्याला आर अश्विनने बाद केले. त्याने 235 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 75 धावा केल्या.

नंतर जर्मेन ब्लॅकवूड आणि जोशुआ दा सिल्वा हे दोघे स्वस्तात बाद झाले. ब्लॅकवूडने २० धावा आणि जोशुआ दा सिल्वाने १० धावा केल्या. अखेरीस एलिक अझानाझ आणि जेसन होल्डरने आणखी पडझड होऊ दिली नाही.

तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 108 षटकात 5 बाद 229 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून एलिक अझानाझ 37 धावांवर आणि जेसन होल्डर 11 धावांवर नाबाद खेळत आहेत. तसेच भारत अद्याप 209 धावांनी आघाडीवर आहे. तत्पुर्वी या सामन्यात भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या आहेत.

शार्दुलच्या जागेवर मिळाली जागा

मुकेशला या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूरच्या जागेवर संधी मिळाली. मुकेश भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 395 वा खेळाडू ठरला आहे. तसेच कसोटी पदार्पण करणारा 308 वा खेळाडू ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT