Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: WTC फायनलमध्ये सलग दोन पराभव विसरत भारताची तिसऱ्या पर्वाला सुरुवात! केव्हा अन् कुठे पाहाल पहिली मॅच

India vs West Indies: भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून सुरु होणार आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st Test, Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारपासून (12 जुलै) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला सामना विंडसर पार्क, डॉमिनिकाला 12 ते 16 जुलैदरम्यान खेळवला जाणार आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात होणारी कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेतून भारत आणि वेस्ट इंडिज संघही कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

विंडसर पार्कमधील खेळपट्टी फलंदाजीला पोषक समजली जाते. तसेच जसजसा सामना पुढे जाईल तसे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचेही वर्चस्व दिसू शकते.

दरम्यान, या सामन्याचा सविस्तर तपशील जाणून घ्या.

1. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना किती तारखेला होणार आहे?

  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलै 2023 दरम्यान होणार आहे.

2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना कोठे खेळवला जाईल?

  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना विंडसर पार्स, रोसौ, डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे.

3. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना किती वाजता खेळवला जाईल?

  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील प्रत्येक दिवसाचा खेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.

4. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता.

5. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना तुम्ही जिओ सिनेमा (Jio Cinema) आणि फॅनकोडवर (FanCode) पाहू शकता.

यातून निवडली जाईल प्लेइंग 11

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

  • वेस्ट इंडिज - क्रेग ब्रॅथवेट(कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथनाझ, तेजनारायण चंदरपॉल, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवॉल, जेसन होल्डर, रेमन रेफर, किर्क मॅकेन्झी, केमार रोच, अल्झारी जोसेफ, शॅनन गॅब्रिएल, जोमेल वॅरिकन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT