Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 81 व्या बॉलने बाउंड्री पार करताच विराट ड्रेसिंग रुमकडे पाहात जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

Video: 81 व्या चेंडूवर चौकार ठोकताच विराटनं ड्रेसिंग रुमकडे पाहात सेलिब्रेशन का केलं, जाणून घ्या.

Pranali Kodre

Virat Kohli celebration after hitting first boundary in 81 balls: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताने पकड मजबूत केली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी विराट कोहलीबाबत एक गमतीशीर घटनाही चाहत्यांना पाहायला मिळाली.

भारताच्या पहिल्या डावात पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात दिली होती. या दोघांनी शतके झळकावण्याबरोबर सलामीला तब्बल 229 धावांची विक्रमी भागीदारीही केली. पण शतकानंतर रोहित 103 धावांवर बाद झाला.

त्याच्यानंतर शुभमन गिलही 11 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्यामुळे जयस्वालला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला. त्याने जयस्वालला चांगली साथ देण्यास सुरुवात केली.

दरम्यान संयमी खेळत असताना विराटला सुरुवातीला चेंडू सीमापार करताना मात्र अपयश येत होते. 80 चेंडू खेळले, तरी त्याच्या बॅटमधून एकही बाऊंड्री आली नव्हती. पण 81 वा चेंडू खेळतान त्याने फिरकीपटू जोमेल वॉरिकनविरुद्ध कव्हर-ड्राईव्हचा शॉट खेळला. या शॉटवर चेंडू सीमापार गेला.

ही विराटची या डावातील पहिली बाऊंड्री ठरली. ही बाऊंड्री मारताच विराटने उपहासात्मक सेलिब्रेशनही केले. त्याने हसत ड्रेसिंग रुमकडे पाहूनही पहिली बाऊंड्री मारल्याचा इशारा केला. त्याचे सेलिब्रेशन पाहून त्याच्याबरोबर फलंदाजी करणाऱ्या जयस्वालच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. या क्षणाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

तथापि, विराट आणि जयस्वाल यांनी दुसऱ्या दिवसाखेर  72 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवसाखेर जयस्वाल 350 चेंडूत 143 धावांवर नाबाद आहे. तसेच विराट ९६ चेंडूत ३६ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या असून भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. 

या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता. वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाझने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 20 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून या डावात कोणालाही 20 धावांचाही टप्पा गाठता आला नाही.

भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तसेच रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट् घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT