Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी भारत-वेस्ट इंडिज संघात होणार मोठे बदल? पाहा संभाव्य Playing XI

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात २० जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 2nd Test, probable Playing XI: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना भारताने १ डाव आणि १४१ धावांनी सहज जिंकला आहे. आता दुसरा सामना २० जुलै रोजी त्रिनिदाद त्रिनिदाद मधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर सुरु होणार आहे.

दरम्यान, भारताने पहिला सामना जिंकला असल्याने मालिका गमावण्याचा धोका टळला आहे. त्यामुळ या सामन्यासाठी एक बदल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो. क्विन्स पार्क ओव्हलमध्ये बऱ्यापैकी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.

त्यामुळे जरी भारताने आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकीपटूंना संघात ठेवले, तरी वेगवान गोलंदाजांच्या फळीत बदल केला जाऊ शकतो. शार्दुल ठाकूरला वनडे मालिकेच्या दृष्टीने आराम दिला जाऊ शकतो, तसेच त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये नवदीप सैनीला खेळवले जाऊ शकते. याशिवाय मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

यष्टीरक्षक म्हणून इशान किशनवरच विश्वास कायम केला जाऊ शकतो. तसेच पहिल्या कसोटी प्रमाणेच या कसोटीतही कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला उतरू शकतो. मधली फळी शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे सांभाळू शकतात. वेगवान गोलंदाजी फळीत मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिज संघातही बदलाची शक्यता

वेस्ट इंडिजच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही दुसऱ्या कसोटीसाठी बदल होण्याची शक्यता आहे. शॅनन गॅब्रिएलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. याशिवाय केविन सिक्लेयरलाही संघात संधी मिळू शकते. त्याला जोमेल वॉरिकनच्या जागेवर संधी मिळू शकते.

वेस्ट इंडिजची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला, तर भारतीय संघ मालिकेत विजय मिळवेलच पण वेस्ट इंडिजला व्हाईटवॉशही देईल. तसेच हा सामना अनिर्णित राहिला, तर भारतीय संघ मालिकेवर कब्जा करेल. त्यामुळे मालिकेतील पराभव आणि व्हाईटवॉश टाळण्यासाठी वेस्ट इंडिजला दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ईशान किशन, आर अश्विन, नवदीप सैनी/शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

  • वेस्ट इंडिज - क्रेग ब्रेथवेट, तेजनारायण चंद्रपॉल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाझ, रेमन रेफर, जोशुआ डी सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, केविन सिक्लेयर, शॅनन ग्रॅब्रिएल, राहकिम कॉर्नवॉल,अल्झारी जोसेफ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT