Nicholas Pooran Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, T20I: निकोलस पूरन भारताला पुरून उरला, पण तरी ICC या कारणाने ठोठावला दंड

Nicholas Pooran: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात झालेल्या एका मोठ्या चूकीबद्दल निकोलस पूरनला आयसीसीने शिक्षा सुनावली आहे.

Pranali Kodre

West Indies' Nicholas Pooran fined 15 per cent of match fee for breaching ICC Code of Conduct:

वेस्ट इंडिज संघाने रविवारी भारतीय संघाला टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात २ विकेट्सने पराभूत केले. वेस्ट इंडिजच्या विजयात निकोलस पूरनने मोलाचा वाटा उचलला होता. त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही मिळवला. पण असे असले तरी त्याला एका चूकीमुळे आयसीसीने दंड ठोठावला आहे.

आयसीसीने पूरनवर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचार संहितेतील नियमाचा भंग केल्या प्रकरणी लेव्हल 1 नुसार सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. पूरनवर आचार संहितेतील कलम 2.7 चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेबद्दल सार्वजनिक टीका करण्याबद्दलचे आहे.

भारताच्या डावातील चौथ्या षटकात पायचीत निर्णायासाठी घेण्यात आलेल्या रिव्ह्यूनंतर ही घटना घडली. पूरनने पंचांनी निर्णयासाठी खेळाडूचा रिव्ह्यू वापरल्याबद्दल टीका केली होती, त्याच्यामते फलंदाजा नाबाद होता.

दरम्यान पूरनने त्याची चूक मान्य केली असून शिक्षाही स्विकारली आहे. त्याच्यावर मैदानातील पंच लेस्ली रेफर, नायजेल डुगुड, तिसरे पंच ग्रेगोरी ब्रेथवेट आणि चौथे पंच पॅट्रिक गस्टर्ड यांनी आरोप लावले होते, तसेच त्याची शिक्षा सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुनावली आहे.

तथापि, पूरनच्या डिसिप्लेनरी रेकॉर्डमध्ये एका डिमिरिट पाँइंटचाही समावेश करण्यात आला आहे. 24 महिन्यांच्या कालावधीतील ही त्याची पहिली चूक आहे.

पूरनने बजावली महत्त्वाची कामगिरी

भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 153 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 18.5 षटकात 8 विकेट्स गमावत 155 धावा करून पूर्ण केले. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 40 चेंडूत 67 धावांची खेळी केली. पूरन वेस्ट इंडिजने 2 धावात 2 विकेट्स गमावल्यानंतर फलंदाजीला आला होता.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोवमन पॉवेलने 21 धावा आणि शिमरॉन हेटमायरने 22 धावांची खेळी केली. अखेरीस 9 व्या विकेटसाठी अकिस होसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी नाबाद 26 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.

भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच युजवेंद्र चहलन 2 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून तिलक वर्माने ५१ धावांची खेळी केली. तिलकशिवाय केवळ इशान किशन (27) आणि हार्दिक पंड्या (24) यांना 20 धावांचा टप्पा पार करता आला. त्यामुळे भारताने 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून अकिल होसेन, अल्झारी जोसेफ आणि रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT