Chances of Rain during RCB vs GT match Dainik Gomantak
क्रीडा

RCB vs GT मॅचवर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कसे असेल IPL Playoff चे समीकरण?

रविवारी संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्याचमुळे IPL 2023 प्लेऑफचे गणितही बिघडू शकते.

Pranali Kodre

Chances of Rain during RCB vs GT match: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी हंगामातील अखेरचे दोन साखळी सामने पार पडणार आहेत. प्लेऑफच्या दृष्टीने हे दोन्ही सामने महत्त्वपूर्ण आहेत. पण, संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सुरू होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्याचमुळे प्लेऑफचे गणितही बिघडू शकते.

हा सामना बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण रविवारी संध्याकाळी या सामन्यादरम्यान पावसाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर मात्र, प्लेऑफमधील समीकरण कसे राहू शकेल, हे जाणून घेऊ.

सध्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी स्थान मिळवले आहे. त्यामुळे सध्या प्लेऑफमध्ये एकच जागा शिल्लक आहे. या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघात चूरस आहे. या तिन्ही संघांचे सध्या 14 गुण आहेत.

पण बेंगलोर आणि मुंबई संघांसाठी जमेची बाजू म्हणजे ते रविवारी त्यांचे अखेरचे साखळी सामने खेळत आहेत. तसेच राजस्थानचे मात्र सर्व 14 साखळी सामने खेळून झालेले आहेत.

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर...

रविवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये दुपारी सामना होत आहे. त्यानंतर बेंगलोर आणि गुजरात संघातील सामना होणार आहे. त्यामुळे जर मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आणि बेंगलोर विरुद्ध गुजरात सामना पावसामुळे रद्द झाला, तर मुंबईला 16 गुणांसह थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करता येणार आहे.

पण जर मुंबईने या सामन्यात पराभव स्विकारला आणि बेंगलोर विरुद्ध गुजरात सामना पावसामुळे रद्द झाला, तर मात्र बेंगलोर 15 गुणांसह थेट प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करेल. कारण सामना रद्द झाल्यानंतर बेंगलोर आणि गुजरातला प्रत्येकी 1 गुण दिला जाईल.

त्याचमुळे मुंबईला आशा असेल, की त्यांनी हैदराबादविरुद्ध सामना जिंकावा आणि आपले प्लेऑफच्या शर्यतीतील स्थान मजबूत करावे. त्यामुळे जरी बेंगलोर आणि गुजरात सामना रद्द झाला, तरी ते थेट प्लेऑफमध्ये पोहचतील.

तसेच बेंगलोरला आशा असेल की हा सामना रद्द न व्हावा, तसेच हा सामना त्यांनी जिंकावा. याशिवाय बेंगलोरला अशीही आशा असेल की जर त्यांचा सामना पावसामुळे रद्द होणार असेल, तर मुंबईने त्यांचा हैदराबादविरुद्धचा सामना पराभूत झालेला असावा.

राजस्थानच्या बाबतीत समीकरण सरळ आहे. त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर हीच अपेक्षा करावी लागेल की मुंबई आणि बेंगलोरने मोठ्या फरकाने त्यांचे सामने पराभूत व्हावेत आणि त्यांचा नेट रन रेट राजस्थानपेक्षा कमी राहावा.

जर या मुंबई आणि बेंगलोर यांंच्यापैकी एकाने किंवा दोन्ही संघांनी विजय मिळवला किंवा मुंबईने पराभव स्विकारला आणि पावसामुळे बेंगलोरचा सामना रद्द जरी झाला, तरी राजस्थानचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT