MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: धोनी IPL 2024 मध्ये खेळणार? चेन्नई सुपर किंग्सच्या CEO ने दिली मोठी प्रतिक्रिया

धोनीच्या अखेरच्या आयपीएल हंगामाबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे सीएओ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

CSK CEO on MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी सध्या वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत येत आहे. तो आयपीएल 2023 हंगामात चेन्नई संघाचे नेतृत्व करताना चांगल्या लयीतही दिसत आहे. पण याच दरम्यान हा त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम ठरू शकतो अशी चर्चा जोर धरत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट विश्वात अशी चर्चा होत आहे की धोनीसाठी आयपीएल 2023 हा खेळाडू म्हणून अखेरचा हंगाम असेल. पण याबद्दल अद्याप धोनीने कोणतेही स्पष्ट भाष्य केलेले नाही. त्यामुळे अजूनही तो निवृत्ती घेणार की नाही, याबद्दलचे रहस्य गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, चेन्नईने आयपीएल 2023 हंगामातील साखळी फेरीचा घरच्या मैदानावरील अखेरचा सामना खेळल्यानंतर चेन्नई संघाच्या सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

कासी विश्वनाथन म्हणाले, 'आम्हाला विश्वास वाटतो की एमएस धोनी पुढील हंगामातही खेळेल. त्यामुळे आशा आहे चाहते आम्हाला नेहमीप्रमाणेच पाठिंबा देत राहातील.'

धोनी 2008 पासून चेन्नई संघाकडून आयपीएल खेळत आहे. 2008 ला झालेल्या पहिल्या-वहिल्या आयपीएल लिलावातून धोनीला चेन्नईने जवळपास 6 कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी केले होते. तेव्हापासून चेन्नईने खेळलेल्या प्रत्येक आयपीएल हंगामात धोनी खेळला असून त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे.

धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 या चार वर्षी आयपीएलची विजेतीपदेही जिंकली आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाराही खेळाडू आहे.

दरम्यान, 41 वर्षीय धोनी आयपीएल 2023 मध्ये चांगल्या लयीत आहे. खालच्या फळीत फलंदाजीला येत त्याने या हंगामात 12 सामन्यांमध्ये 196 च्या सरासरीने 98 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 10 षटकारांचा आणि 3 चौकारांचा समावेश आहे.

चाहत्यांसाठी चेन्नईची खास भेट

चेन्नईने एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर 14 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना खेळला, ज्यात चेन्नईला 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. पण हा आयपीएल 2023 स्पर्धीतील चेन्नईचा घरच्या मैदानावरील अखेरचा साखळी सामना असल्याने त्यांनी चाहत्यांना जर्सी आणि टेनिस बॉल भेट दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT