Water Boy Virat Kohli Funny antics during India vs Bangladesh Asia Cup 2023 Super Four Match, watch Video:
आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (15 सप्टेंबर) होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यातून 5 अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, या 5 खेळाडूंमध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे.
दरम्यान, विराटला या सामन्यासाठी विश्रांती मिळाली असल्याने तो वॉटरबॉय बनला होता. याचदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट मैदानात पाणी आणतानाही मस्ती करताना दिसत आहे.
झाले असे की ड्रिंक्स ब्रेक झाला असताना विराट मोहम्मद सिराजसह मैदानात पाणी घेऊन निघाला होता. यावेळी तो मैदानात येत असताना वेगवेगळे हावभाव करत पळत येत होता. त्याचा हा व्हिडिओ डिज्नी+हॉटस्टारने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.
दरम्यान, विराटसह या सामन्यात हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
त्यांच्याऐवजी प्लइंग इलेव्हनमध्ये तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना बांगलादेशविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, तिलक वर्माला संधी मिळाली असल्याने त्याचे हे वनडे पदार्पणही ठरले आहे. तो भारताकडून वनडे पदार्पण करणारा 252 वा खेळाडू ठरला आहे. त्याला भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते वनडे पदार्पणाची कॅप देण्यात आली.
दरम्यान, भारताचा हा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी अखेरचा सुपर फोरचा सामना आहे. तसेच भारताने अंतिम सामन्यात यापूर्वीच प्रवेश निश्चित केला असल्याने बांगलादेशविरुद्ध बेंच स्ट्रेंथचा आजमावली आहे.
बांगलादेशविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.