Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon. Dainik Gomantak
क्रीडा

Wasim Jaffer: तीन स्पिनर, एक ऑलराउंडर अन् पहिल्यांदा... चंद्राचा पृष्ठभाग पाहून वसीम जाफरने बनवला पिच रिपोर्ट

chandrayaan 3: चंद्राच्या पृष्ठभागाकडे पाहून वसीम जाफरने साजेसा संघ निवडला आहे. तसेच त्याचा पिच रिपोर्ट वाचून चाहते तो एन्जॉय करत आहेत.

Ashutosh Masgaunde

Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon:

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे आणि तो त्याच्या मजेशीर पोस्टसाठी प्रसिद्ध आहे. जाफरने पुन्हा एकदा ट्विटरवर मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्याने चंद्राचा पृष्ठभाग पाहून पिच रिपोर्ट आणि आपली टीम बनवली आहे. जाफरची ही पोस्ट चाहते खूप एन्जॉय करत आहेत.

वसीम जाफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले "नक्कीच, याकडे पाहून असे वाटते हे पिच प्रथम फलंदाजीसाठी योग्य आहे. मी तीन फिरकी गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंसोबत मैदानात उतरेन."

दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो शेअर करत वसीम जाफरने आपल्या टीम निवडीनंतर आणि पिच रिपोर्टही बनवल्याने. जाफरने केलेल्या ट्विटला क्रिकेट चाहते भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

भारताच्या इस्रोने बुधवारी आपले चांद्रयान 3 (chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवले. यासह चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने हे केले आहे.

भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले रोव्हर पाठवले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा प्रचंड साठा असू शकतो. चंद्राचा हा भाग नेहमीच शास्त्रज्ञांच्या आवडीचा विषय राहिला आहे.

भारताच्या इस्रोने यापूर्वी 2019 मध्ये देखील चांद्रयान पाठवले होते, परंतु त्यानंतर भारताला यश मिळाले नाही. आता चार वर्षांनंतर भारताने चंद्रावर यशस्वीरित्या चांद्रयान उतरवले आहे.

यापूर्वी, इस्रोच्या शास्त्रज्ञांचे छायाचित्र शेअर करताना जाफरने त्यांचे कौतुक केले होते आणि म्हणाला होता की, जे लोक आपल्याला चंद्रावर घेऊन जातात ते जमिनीशी जोडले जाऊ शकतात. हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगवर जाफरने लिहिले की, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT