Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident: पंतने आराम करायचा कसा? पाहुण्यांची वर्दळ ठरतेय डोकेदुखी

अपघातात दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंतवर सध्या उपचार सुरू आहेत, पण त्याला आराम करण्यात अडथळा निर्माण होत आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अपघात झाला. दिल्लीवरून रुडकीला येत असतानाचा त्याची कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात त्याला अनेक ठिकाणी दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पण, त्याला हॉस्पिटलमध्ये सातत्याने कोणी ना कोणी भेटायला येत आहे, त्यामुळे त्याला आराम मिळत नसल्याचे आता म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे.

पंतवर उपचार करत असलेल्या मेडिकल टीममधील एका सदस्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की 'ऋषभ पंतला पुरेसा मानसिक आणि शारिरीक विश्राम मिळणे गरजेचे आहे. त्याला अजूनही दुखापतींमुळे वेदना होत आहेत. त्याला भेटायला येणाऱ्या लोकांबरोबर बोलावे लागत आहे. त्यामुळे लवकर बरे होण्यासाठी लागणारी एनर्जी त्यात वाया जात आहे.'

'त्याला भेटायला येण्याची योजना करणाऱ्या लोकांनी सध्यातरी हे टाळले पाहिजे आणि त्याला आराम करू दिला पाहिजे.'

तसेच हॉस्पिटलमधील आणखी एका सदस्याने सांगितले की 'सध्या तरी पंतला भेटायला येणाऱ्यांसाठी कोणतेही फिल्टर लावण्यात आलेले नाही. हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते 5 या दरम्यान भेटायला येण्याची वेळ असते. तसेच या वेळेत केवळ एका व्यक्तीलाच रुग्णाला भेटण्याची परवानगी असते. पण पंतची केस हाय प्रोफाईल आहे, त्यामुळे अनेक लोक भेटायला येत आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.'

रिपोर्ट्सनुसार आत्तापर्यंत पंतला दिल्ली क्रिकेट बोर्डातील सदस्य, सरकारी अधिकारी, अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर, क्रिकेटपटू नितीश राणा यांसारखे अनेक मान्यवर भेटून गेले आहेत.

दरम्यान, पंतच्या डोक्याला, पाठीला, हाताला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. दरम्यान, त्याच्या मेंदूचे आणि पाठीच्या स्कॅनचे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचे समजले आहे. पण त्याच्या गुडघ्यामध्ये लिगामेंट टियर आहेत. त्यामुळे त्याला या दुखापतीमधून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी कमीत कमी 6 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 6 महिने तरी त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही; आपच्या कार्यकर्त्यांना मंत्री कामतांच्या जवळच्या व्यक्तीने धमकावल्याचा पालेकरांचा आरोप Video

SCROLL FOR NEXT