Vishnu Saravanan qualify for Paris Olympic 2024 PTI
क्रीडा

Vishnu Saravanan Olympics Quota : भारताच्या विष्णूने रचला इतिहास; सेलिंगमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Paris Olympic: भारताचा सेलर विष्णू सारवान पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असल्याने त्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंदही केली.

Pranali Kodre

Vishnu Saravanan first Indian sailor to qualify for consecutive Olympics:

भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता सेलर विष्णू सारवान याने पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिक 2024 पात्रता मिळवली आहे. याबरोबरच त्याच्या नावावर ऐतिहासिक विक्रमाचीही नोंद झाली.

विष्णू सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकलाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला सेलर आहे. तो टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला होता. मुंबईस्थित आर्मी यॉटिंग नोडमधील सुभेदार असलेल्या विष्णूने ऍडलेडला झालेल्या आयएलसीए-7 वर्ल्ड चॅम्पियनशीप सेलिंग स्पर्धेतून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.

24 वर्षीय विष्णू या चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झालेल्या 152 स्पर्धकांमध्ये 26 व्या क्रमांकावर आला. त्यामुळे त्याने उच्च स्थरावर दाखवेलल्या त्याच्या कौशल्याच्या जोरावर त्याने दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कोटा मिळवला.

दरम्यान, तो आशियाई देशांतील खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी राहिला. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या सिंगापूरच्या सेलरलाही मागे टाकले. तसेच त्याने हाँग काँग आणि थायलंडच्या खेळाडूंनाही मागे टाकण्यात यश मिळवले.

विष्णूने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये एकूण 174 स्कोअर केला. पण मानक नियमांनुसार शर्यतीतील त्याचा सर्वात कमी स्कोअर 49 त्याच्या एकूण स्कोअरमधून वजा करण्यात आला. त्यामुळे त्याचा स्कोअर 125 झाला.

तो पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरणारा भारताचा पहिला सेलर आहे. विष्णूने यापूर्वी 2019 मध्ये 21 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT