Kusal Mendis Twitter/ @virendersehwag
क्रीडा

World Cup 2023: 'कुसलने पाकिस्तानच्या कुशलतेची...', मुलतानच्या सुलतानचे ट्विट व्हायरलं!

PAK vs SL World Cup 2023: भारतीय चाहत्यांसह दिग्गज क्रिकेटपटूंच्या नजरा आयसीसी विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका सामन्यावर खिळल्या आहेत.

Manish Jadhav

PAK vs SL World Cup 2023: भारतीय चाहत्यांसह दिग्गज क्रिकेटपटूंच्या नजरा आयसीसी विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका सामन्यावर खिळल्या आहेत.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने मिळून कर्णधार दसुन शनाकाचा निर्णय अगदी योग्य असल्याचे सिद्ध केले.

दरम्यान, या दोघांनी पाकिस्तानच्या (Pakistan) जागतिक दर्जाच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध झंझावाती शतके झळकावली. श्रीलंकेने 50 षटकात 9 विकेट गमावत 344 धावा केल्या. कुसल मेंडिस 77 चेंडूत 122 धावा करुन बाद झाला तर सदीरा 89 चेंडूत 108 धावा करुन बाद झाला.

या दोघांशिवाय पथुम निसांकाने 51 धावांची खेळी खेळली. कुसल मेंडिसच्या खेळीचे कौतुक करताना टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर अशी पोस्ट लिहिली, जी व्हायरल होत आहे.

सेहवागने लिहिले की, 'कुसल हे सुनिश्चित करत आहे की, पाकिस्तानची कुशलता राहिली नाही. कुसल मेंडिसने शानदार खेळी खेळली. दोन्ही सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली, पण हे शतक खूप खास आहे.'

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला होता, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दुसरीकडे, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध सामना खेळायचा आहे. मात्र, आज पाकिस्तान जिंकल्यास भारताविरुद्धच्या सामन्यात त्याचा आत्मविश्वास वाढेल.

याशिवाय, पाकिस्तानला आशिया चषक 2023 च्या सुपर-4 सामन्याचा हिशेब देखील श्रीलंकेविरुद्ध चुकता करायचा आहे, जिथे पाकिस्तानचा श्रीलंकेकडून पराभव झाला होता. या पराभवाने पाकिस्तान आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT