Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

'क्या फेकता है', मुलतानच्या सुलतानने Neeraj Chopra वर उधळली स्तुतीसुमने

Neeraj Chopra: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग कोणत्या कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो.

दैनिक गोमन्तक

World Athletics Championships: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग कोणत्या कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. यातच आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल सेहवागने एक ट्विट केले आहे. जे आता प्रचंड व्हायरल होत आहे. नीरज चोप्रासाठी पहिले तीन प्रयत्न निराशाजनक होते, परंतु चौथ्या थ्रोने त्याने जोरदार पुनरागमन करुन रौप्यपदकावर दावा केला. नीरज चोप्राच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतातील सर्व सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले. यामध्ये वीरेंद्र सेहवागचे ट्विट सर्वाधिक पसंत केले जात आहे.

सेहवागने (Virender Sehwag) ट्विटमध्ये म्हटले की, 'चॅम्पियन नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) आभार. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून तुम्ही पुन्हा एकदा भारताला गौरव प्रदान केला आहे.'

दुसरीकडे, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक जिंकले होते. भालाफेकमध्ये तो सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी हा पराक्रम अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये केला होता, जेव्हा त्याने लॉन्ग जम्पमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT