Virender Sehwag - England X
क्रीडा

IND vs ENG: भारत दौऱ्यावर इंग्लंड घेऊन येणार शेफ? सेहवाग म्हणतोय, 'ही गरज तेव्हा पडली, जेव्हा...'

Virender Sehwag: रिपोर्ट्सनुसार इंग्लंड भारत दौऱ्यावर वैयक्तिक शेफ घेऊन येणार आहे, त्यावर सेहवागने टीका केली आहे.

Pranali Kodre

Virender Sehwag takes a dig at England after reports surfaced that Ben Stokes' team touring India with their own chef:

इंग्लंड संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडला भारताविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका 25 जानेवारी ते 11 मार्चदरम्यान खेळवली जाणार आहे.

दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या दौऱ्यात इंग्लंड संघ त्यांच्या वैयक्तिक शेफला घेऊन येणार आहे. इंग्लंड त्यांच्या जेवणार पौष्टिकता ठेवण्यासाठी मँचेस्टर युनायडेट या फुटबॉल संघाचा शेफ ओमर मेझिनला बरोबर आणणार असल्याचे म्हटले जात आहे.

याबद्दल इंग्लंडच्या बार्मी आर्मीच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. त्यांनी लिहिले आहे की 'इंग्लंड त्यांच्याबरोबर भारत दौऱ्यावर त्यांचा वैयक्तिक शेफ घेऊन जाणार आहेत, ज्यामुळे खेळाडू आजारी पडणे टाळू शकतात.'

यावर सेहवागने उत्तर देताना इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकची आठवण करून दिली. तसेच त्याने आयपीएलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना याची गरज पडणार नाही, असे म्हणतही टीका केली. सेहवागने लिहिले की 'ही गरज कूक गेल्यानंतर पडली. आयपीएलमध्ये नाही पडणार.'

दरम्यान, इंग्लंडने त्यांच्या वैयक्तिक शेफ परदेशी दौऱ्यावर नेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावेळीही शेप ओमर मेझिनला बरोबर नेले होते. त्या दौऱ्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडने पाकिस्तानला 3-0 असे पराभूत केले होते.

भारत दौऱ्यावर शेफ आणण्याबद्दल द टेलिग्राफने वृत्त दिले होते, त्यात म्हटले होते की 'इंग्लंड संघ त्यांच्या भारत दौऱ्यात त्यांचा शेफ घेऊन जातील आणि या 7 आठवड्याच्या दौऱ्यात आजारी न पडण्याचा प्रयत्न करतील. शेफ 25 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या आधी हैदराबादमध्ये संघाशी जोडला जाईल. ज्यामुळे त्यांच्या खेळाडूंना पौष्टकता देण्याचा प्रयत्न असेल.'

इंग्लंड भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादला खेळणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला दुसरा सामना, 15 फेब्रुवारीपासून राजकोटला तिसरा सामना, 23 फेब्रुवारीपासून रांचीला चौथा सामना आणि 7 मार्चपासून धरमशालाला येथे पाचवा सामना सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT