Virat Kohli X
क्रीडा

SA vs IND, Video: कधी 'राम सिया राम' गाण्यावर महाराजचे स्वागत, तर कधी गिलबरोबर फुगडी, विराटने केपटाऊनमध्ये लुटली मैफील

Virat Kohli Video: केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीने विविध कृतींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Pranali Kodre

Virat Kohli's gestures during SA vs IND, 2nd Test at Cape Town wins internet:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात चालू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (3 जानेवारी) सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी विराटने क्षेत्ररक्षण करताना केलेल्या विविध कृतीने प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. त्याचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.

केशव महाराजचे विराटकडून स्वागत

या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवरच संपुष्टात आला. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला संघर्ष करायला लावला होता.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू केशव महाराज 16 व्या षटकातच आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी स्टेडियममध्ये राम सिया राम हे गाणे वाजायला लागलं.

त्याचवेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने केशव महाराजला पाहून हात जोडले आणि त्याने तिरंदाजी करत असल्यासारखे हावभाव केले. हा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

एल्गारसमोरही झुकला विराट

इतकेच नाही, तर या सामन्यात भारताचाही पहिला डाव पहिल्याच दिवशी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा दक्षिण आफ्रिका फलंदाजीला उतरले. यावेळी दक्षिण आफ्रिकेने कर्णधार डीन एल्गारची विकेट 10 व्या षटकात गमावली.

अखेरचा सामना खेळत असलेल्या एल्गारची ही अखेरची खेळी ठरली. त्यामुळे त्याचा झेल घेतल्यानंतर विराटने सेलिब्रेशन न करता त्याला मान द्या, अशा अर्थाचे हावभाव करत करोडो मनं जिंकली.

गिलबरोबर खेळली फुगडी

या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यात काही वेळच शिल्लक असताना देखील विराट मस्तीच्या मुडमध्ये होता. यावेळी तो शुभमन गिलबरोबर मस्ती करताना दिसला होता. आधी तो त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसला आणि नंतर चक्के त्यांनी फुगडी खेळली. याघटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

पहिल्याच दिवशी दोन्ही संघांची फलंदाजी कोलमडली

दरम्यान, या सामन्यात दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 55 धावांत सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डावही 153 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 62 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या दिवसाखेर एकूण 23 विकेट्स गेल्या. पहिल्या दिवसाखेर भारताकडे 36 धावांची आघाडी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT