Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: विराटच्या करिअरमध्ये 9 वर्षानंतर येणार 'हा' खास क्षण, चाहत्यांची प्रतिक्षा संपणार!

Manish Jadhav

Virat Kohli Asia Cup 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडिया आता दीर्घ विश्रांतीवर आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर खास अंदाजात करताना दिसणार आहे.

टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आशिया कपसारखी मोठी स्पर्धा खेळायची आहे. विराटसाठी ही स्पर्धा खूप खास असणार आहे. विराटच्या करिअरमध्ये तब्बल 9 वर्षानंतर एक खास क्षण येणार आहे.

9 वर्षांची प्रतीक्षा संपणार

आगामी आशिया कप-2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आशिया कप-2023 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. यंदा आशिया चषक वनडे फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया चषक शेवटचा 2018 मध्ये वनडे फॉर्मेटमध्ये खेळला गेला होता.

मात्र, विराट या स्पर्धेचा भाग नव्हता. अशा परिस्थितीत तो 9 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये आशिया कप खेळणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) शेवटचा आशिया कप 2014 मध्ये 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळला होता.

एकदिवसीय आशिया कपमध्ये विराटची कामगिरी

एकदिवसीय आशिया कपमध्ये विराट कोहलीने 10 डावात 61.3 च्या सरासरीने 613 धावा केल्या आहेत. एकदिवसीय आशिया कपमध्ये विराटची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे. त्याने ही खेळी पाकिस्तानविरुद्ध खेळली होती.

त्याने एकदिवसीय आशिया कपमध्ये 1 अर्धशतक आणि 3 शतके झळकावली आहेत. मात्र, 2014 च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाला (Team India) फायनलसाठी पात्रता मिळवता आली नाही. या स्पर्धेत भारताने केवळ दोनच सामने जिंकले.

आशिया चषकासाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारले

आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) 2023 आशिया चषकासाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे. म्हणजेच कॉन्टिनेन्टल चॅम्पियनशिप दोन देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये सहा संघांची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील.

यानंतर, टॉप-2 संघ अंतिम फेरीत ट्रॉफीसाठी आमने-सामने असतील. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे संघ खेळणार आहेत. भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार्‍या विश्वचषकापूर्वी हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT